सर्वसामान्य ग्राहकांसाठी वरण स्वस्त, भात महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:48 AM2018-03-06T00:48:06+5:302018-03-06T00:48:06+5:30
यंदा देशात उडीद, मूग, तूर, हरभराच्या बंपर उत्पादनामुळे मागील वर्षाच्या तुलनेत डाळींचे भाव क्विंटलमागे ६०० ते तीन हजार रु पयांपर्यंत घसरले आहेत, तर बासमती तांदळाची वाढलेली निर्यात व अन्य भात पिकांचा उतारा घटल्याने तांदळाचे भाव क्विंटलमागे ५०० ते २००० हजार रु पयांनी दरम्यान वाढले आहेत. त्यामुळे यंदा वरण स्वस्त, तर भात महाग अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
नाशिक : यंदा देशात उडीद, मूग, तूर, हरभराच्या बंपर उत्पादनामुळे मागील वर्षाच्या तुलनेत डाळींचे भाव क्विंटलमागे ६०० ते तीन हजार रु पयांपर्यंत घसरले आहेत, तर बासमती तांदळाची वाढलेली निर्यात व अन्य भात पिकांचा उतारा घटल्याने तांदळाचे भाव क्विंटलमागे ५०० ते २००० हजार रु पयांनी दरम्यान वाढले आहेत. त्यामुळे यंदा वरण स्वस्त, तर भात महाग अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. देशांतर्गत डाळींचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने योजना विविध योजना आणल्या. त्यात पोषक वातावरणामुळे मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात व कर्नाटक या राज्यात मूग, उडीद पिकांचे भरघोस उत्पादन झाले आहे. सरकारकडे व व्यापारांकडे मागील वर्षीची तूरडाळ मोठ्या प्रमाणात शिल्लक असतानाच यावर्षीही मोठ्या प्रमाणात पीक आल्याने डाळींचे भाव गेल्या वर्षाच्या तुलनेत घसरले आहेत, तर सुगंध व चवीने खवय्यांना आकर्षित करणारा बासमतीला सध्या विदेशातून मोठी मागणी आहे. यात सर्वाधिक मागणी इराण, इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अमिरातील या आखाती देशांतून होत आहे. इराणने या वर्षी बासमती तांदळाची आयात वाढविली आहे. त्याच-बरोबर, युरोपियन महासंघातील देश व अमेरिकाही मागील काही वर्षांच्या तुलनेत जास्त बासमती तांदूळ खरेदी करीत आहे. यामुळे बासमतीमध्ये मागील हंगामाच्या तुलनेत यंदा दोन हजार रु पयांपर्यंत भाववाढ झाली आहे. अस्सल बासमती सध्या दहा हजार ते आकरा हजार रु पये प्रति क्विंटलने विकला जात आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत बासमती तांदूळही एक ते दोन हजार रुपयांनी वधारला आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०१७ या काळात देशातून ६३ लाख टन तांदळाची विक्र मी निर्यात झाली आहे, अशा परिस्थितीत भात (धान) उत्पादनात उतारा ३० टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे देशात हंगामाच्या सुरु वातीलाच तांदळात क्विंटलमागे ५०० ते २००० रु पयांपर्यंत भाववाढ झाल्याने गेल्या दोन वर्षांपूर्वी सर्वसामन्यांच्या ताटातून हद्दपार झालेले वरण स्वस्त झाले आहे. त्यामुळे रोजच्या आहारातील भात मात्र महागला असला तरी यावर्षी गव्हाचे दर स्थिर असून, साखरीचे दर तीन ते चार रुपयांनी घसरल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये तांदूळ दरवाढीमुळे निर्माण झालेली नाराजी काही अंशी कमी झाल्याची दिसून येत आहे.
साखर घसरली, तेल वधारले
अन्नधान्यासह यावर्षी इतर मालाच्या भावातही चढ-उतार झाले आहेत. यात प्रामुख्याने साखरीचे दर प्रतिकिलोला पाच ते सहा रुपयांनी घसरले आहेत, तर खाद्यतेलाचा १५ लिटरचा डबा ३० ते ४० रुपयांनी महागला आहे. थोडक्यात स्वयंपाकघरातील काही वस्तू महागल्या असल्या तरी काही वस्तू स्वस्त झाल्यामुळे गृहिनींना किचनचे बजट जुळविणे शक्य झाल्याचे दिसून येत आहे.