लासलगाव रेल्वेस्थानकाला महाप्रबंधकांची भेट
By admin | Published: January 19, 2017 12:41 AM2017-01-19T00:41:46+5:302017-01-19T00:42:02+5:30
लासलगाव रेल्वेस्थानकाला महाप्रबंधकांची भेट
लासलगाव : येथील रेल्वेस्थानकाच्या निरीक्षणासाठी महाप्रबंधक डी. के. शर्मा यांनी भेट देत परिसराची तसेच रेल्वेस्थानकाजवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी लासलगाव येथील प्रवासी संघटना, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, समर्थ प्रतिष्ठान यांच्यातर्फे लासलगाव येथे कामायनी, नंदीग्राम, अमृतसर-दादर एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा मिळावा, असे निवेदन देण्यात आले. मालधक्क्यावर फक्त लोडिंग होते तेथे अनलोडिंग सुविधा सुरू करावी, लासलगाव मालधक्क्यावरून लोडिंग होणारा माल दक्षिणेकडे टू पॉइंट अनलोडिंग सुविधा सुरू करावी, रेल्वेस्थानक परिसर व बुकिंग आॅफिसजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे आदि मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नवीन गाड्यांच्या थांब्याबाबत रेल्वेमंत्र्यांशी आपली दिल्लीत चर्चा झालेली आहे. गाड्यांना थांबे आणि प्रवाशांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा आग्रह खासदार चव्हाण यांनी महाप्रबंधक डी. के. शर्मा यांना केला. शर्मा यांनी या कामासाठी खासदार निधीतून निधी उपलब्ध करून द्यावा, असे उलट सुचविले. यावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी शौचालयासाठी निधी देण्याची तयारी दर्शविली. याप्रसंगी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष प्रदीप गांगुर्डे, शैलेश साबद्रा, डॉ. युवराज पाटील, सिद्धार्थ दाभाडे, तुषार गोरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दायमा, शंतनू पाटील, नीलेश सालकाडे, योगेश पाटील, गिरीश साबद्रा, विशाल पालवे, पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील,
सूरज नाईक, दत्ता पाटील, समर्थ प्रतिष्ठानचे संदीप उगले, प्रमोद पाटील, मयूर वाकचौरे, राजेंद्र कराड, मयूर झांबरे,उमेश लचके,
महेंद्र हांडगे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)