प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची सर्वसाधारण सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:15 AM2021-03-31T04:15:04+5:302021-03-31T04:15:04+5:30
या सभेत सभासद शिक्षकांसाठी कर्जमर्यादा २५ लाखांपर्यंत वाढ तसेच सर्व कर्जावरील व्याजदरात १ टक्के कपातीच्या निर्णयाची माहिती अध्यक्ष ...
या सभेत सभासद शिक्षकांसाठी कर्जमर्यादा २५ लाखांपर्यंत वाढ तसेच सर्व कर्जावरील व्याजदरात १ टक्के कपातीच्या निर्णयाची माहिती अध्यक्ष केदु देशमाने, उपाध्यक्ष धनंजय आहेर यांनी दिली. दि. ३१ मार्चअखेर संस्थेचे २६४१ सभासद असून अहवाल वर्षात संस्थेने ५ कोटी ९६ लक्ष ७१ हजार इतके कर्ज वाटप केले आहे. संस्थेच्या शेअर्स मूल्यांकनात १७.६० टक्क्यांनी वाढ झाली असून वार्षिक खर्चात २७ लाख ४० हजार ५६८ रुपयांची बचत करण्यात आली आहे. सन २०२१-२२ साठी सर्व कर्जावर दि.१ एप्रिलपासून शेकडा १० टक्के व्याज आकारणी करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले. आचार्य दोंदे विद्यार्थी भवन नाशिक न्यासाचे वार्षिक सभेत सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.
याप्रसंगी अध्यक्ष केदू देशमाने, उपाध्यक्ष धनंजय आहेर, वामन खैरनार, प्रकाश सोनवणे, प्रदीप खैरनार, संजीव साळुके, हेमंत पवार, सुभाष अहिरे, अर्जुन ताकाटे, मनोहर वाघेरे, संजय भोर, संजय दराडे, अर्जुन भोये, राजाराम खैरनार, नंदू आव्हाड, प्रतिभा अहिरे, शोभा कापडणीस, मोतीराम सहारे, पुरुषोत्तम इंगळे यांच्यासह सभासद ऑनलाईन उपस्थित होते.