सामान्यांना नाही मास्कची गरज : आरोग्यमंत्री राजेश टोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 12:26 AM2020-03-07T00:26:18+5:302020-03-07T00:26:42+5:30

हाराष्ट्रात एकही कोरोनाग्रस्त रु ग्ण आढळलेला नाही. त्यामुळे घाबरून किंवा गडबडून जाण्यासारखी स्थिती अजिबात नाही. तसेच सामान्यांनी मास्क वापरण्याचीदेखील आवश्यकता नाही. केवळ गर्दीच्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून रुमाल बांधला तरी पुरेसा असल्याचे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्व नागरिकांना आश्वस्त केले.

General needs no mask: Health Minister Rajesh Tope | सामान्यांना नाही मास्कची गरज : आरोग्यमंत्री राजेश टोपे

सामान्यांना नाही मास्कची गरज : आरोग्यमंत्री राजेश टोपे

googlenewsNext
ठळक मुद्दे स्वच्छ रुमाल वापरण्याचा दिला सल्ला

नाशिक : महाराष्ट्रात एकही कोरोनाग्रस्त रु ग्ण आढळलेला नाही. त्यामुळे घाबरून किंवा गडबडून जाण्यासारखी स्थिती अजिबात नाही. तसेच सामान्यांनी मास्क वापरण्याचीदेखील आवश्यकता नाही. केवळ गर्दीच्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून रुमाल बांधला तरी पुरेसा असल्याचे सांगत राज्याचे आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी सर्व नागरिकांना आश्वस्त केले.
एका रुग्णालयाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आरोग्यमंत्रीनाशिकमध्ये आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. केवळ संसर्गाच्या भीतीमुळे लोक मास्क आणि सॅनेटायझर्सची खरेदी करीत आहेत. वास्तविक मास्क वापरण्याची गरज आहे काय? असा सवालदेखील टोपे यांनी उपस्थित केले. ज्या व्यक्ती वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत, डॉक्टर्स आहेत, रुग्णालयांचे स्टाफ आहेत, त्यांनीच या साधनांचा वापर करावा, असेही त्यांनी नमूद केले. या आजाराचा व्हायरस हवेत पसरत नाही. केवळ करोनाग्रस्त रुग्णाला हातमिळविणी केल्यास किंवा त्याच्या थुंकीच्या संपर्कात आल्यास हा आजार होतो. त्यामुळे उगाचच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवून लोकांनी भीतीच्या वातावरणात वावरू
नये.
केवळ स्वत:ची काळजी घेण्यास प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शुक्र वारी दुपारी दीड ते अडीच वाजेदरम्यान विविध राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी व्हीसीच्या माध्यमातून चर्चा करीत कोरोना आजाराचा आढावा घेतल्याचेही टोपे यांनी सांगितले. तसेच या आजाराशी लढा देण्यासाठी देशातील संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.
संदर्भ रुग्णालयात रेडिएशनसह किडनी ट्रान्सप्लांट
विभागीय संदर्भ रुग्णालयात सध्या बंद पडलेला रेडिएशन विभाग पूर्ववत सुरू करण्यात येणार असून, त्याबाबतचे निर्देश संबंधितांना देण्यात आले असल्याचे टोपे यांनी सांगितले. तसेच प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षा असलेला किडनी ट्रान्सप्लांट विभागालादेखील लवकरात लवकर मंजुरी देण्याबाबतची पूर्तता करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी नमूद केले.
तर संबंधितांवर कारवाई
मूळ किमतीपेक्षा अधिक दराने एखादी वस्तू विकल्यास त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करता येते. त्याबाबतचे कायदेही अस्तित्वात आहेत. त्यामुळे कोणी मास्कचा व सॅनेटायझर्सचा काळा बाजार करीत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. आतापर्यंत आम्ही मास्कचा काळाबाजार करू नये याविषयी आवाहन करीत होतो. परंतु विक्रे त्यांनी हे प्रकार थांबविलेच नाहीत, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली.

Web Title: General needs no mask: Health Minister Rajesh Tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.