वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 05:45 PM2018-10-24T17:45:27+5:302018-10-24T17:45:34+5:30

इगतपुरी :वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असुन विद्यमान सरकारला कोणताही फरक दिसुन येत नाही.

The general public suffered from rising inflation | वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त

वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त

Next

इगतपुरी :वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असुन विद्यमान सरकारला कोणताही फरक दिसुन येत नाही. शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यापारी, विद्यार्थी, हे सर्व घटक महागाई व बेरोजगारी खाली आण िशासनाच्या फसव्या योजनांना कंटाळले असुन इगतपुरी तालुक्यातील लोड शेडिंग कमी करण्यात यावे, जळालेले ट्रान्सफार्मर त्वरीत बसविण्यात यावे, शेतकर्यांना संपुर्ण कर्जमाफी मिळावी, तसेच तालुक्यात भविष्यात निर्माण होणार्या पाणी टंचाई बाबत आवश्यक तरतुद करण्यात यावी, पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करावे, तालुक्यातील भुमीपुत्रांना, धरण ग्रस्तांना गोंदे औद्योगिक वसाहतीत कायम स्वरूपी नौकरी मिळावी, स्वाईन फ्लु सारख्या संसर्गजन्य रोगावर त्वरीत योग्य त्या उपाय योजना करण्यात याव्यात, तसेच भावली धरणाचे पाणी शहापुरला जाऊन देवु या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्ष उमेश खातळे व माजी पंचायत समतिी सदस्य गोरख बोडके यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार राजेंद्र कांबळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा लोकसभा अध्यक्ष कोंडाजी आव्हाड , कार्यअध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुने, महाराष्ट्र प्रदेश सचिव अँड. संदिप गुळवे, पंचायत समतिीचे माजी उप सभापति पांडुरंग वांरूगसे, जिल्हा परिषद गटनेते उदय जाधव, शहराध्यक्ष प्रल्हाद जाधव, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष शिवा काळे यांच्यासह अध्यक्ष मनिष भागडे, विसम सैयद, अक्षय दळवी, ज्ञानेश्वर फोकणे, पोपट भागडे, मदन कडु, अनिल पढेर, रोशन जाधव, कोंडाजी गुळवे, संजय कोकणे, उत्तम जाधव, निवृत्ती भगत, विजय नाठे, उत्तम सहाणे, नारायण वळकंदे, माजी सभापती आनंराव सहाणे, कचरू कडभाणेआदी उपस्थित होते.

Web Title: The general public suffered from rising inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक