ओव्हरलोडमुळे जनित्र नादुरूस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 03:31 PM2020-01-19T15:31:13+5:302020-01-19T15:32:45+5:30
ओझरटाऊनशिप : ओझर दिक्षी शिवारातील जनित्र फ्युज ओव्हरलोडमुळे वारंवार जळत असल्याने ने नादुरूस्त आहे. गेल्या पांच वर्षापासून त्या जागेवर नवीन जनित्र मंजूर असूनही विजवितरण व पारेशन विभागाकडूनअंमलबजावणी होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. याप्रकरणी शेतक -यांची ओझर विजवितरण कार्यालया कडून अडवणुकहोत असल्याची तक्र ार फिडरशी संलग्घ शेतकº्यांनी केली आहे
ओझर -दीक्षी शिवारातील ब्रिटीश कालीन कालव्यालगत असलेली बुद्धन भाई डीपीचे फ्यूज नेहेमी नादुस्त व फुटलेल्या अवस्थेत असतात. अनेक वेळेस वायरमनला फोन केला असता मी येतो असे सांगितले जाते. शेतकरी तासंतास वाट बघून गरजेपोटी जीव धोक्यात घालून स्वत: फ्युज दुरूस्त करून बसवण्याचा धोका पत्करतात. यात काही दुर्घटना घडण्याची शक्यता असते. तसेच नवीन डीपी मंजूर झाली असल्याचे पाच वर्षा पासून सांगतात. दरवेळी शेतकऱ्यांच्य ा या मागणीदुर्र्लक्ष केले जात असल्याची तक्रार आहे. सद्या रब्बी पिका सह गहू हरबरा भाजीपाला व प्रामुख्याने द्राक्ष हंगामात पिकांना पाणी देणे अत्यावश्यक आह.े त्यातच लोड शेडींग व रात्रीचा विजपुरवठा होत असल्यामुळे शेतकº्यांना भरपुर अडचणींना तोंड द्यावं लागते. सदर डीपी वरती उगले मळा ठुबे मळा जाधव मळ्यापासून दीक्षीचे माजी पोलीस पाटील अंबादास चौधरी यांचा मळा आण इतर अनेक शेतकऱ्यांची पिके या डीपीवर अवलंबून आहेत. तरी लवकरात लवकर नवीन डीपी मिळावी अशी सर्व शिवारातील शेतकºयांनी मागणी केली आहे .