दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार गुणपत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 01:33 AM2019-06-14T01:33:29+5:302019-06-14T01:35:08+5:30
दहावीच्या निकालानंतर उत्तीर्ण झालेल्या दोन लाख विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेचा अर्ज दाखल करण्यासाठी प्रतीक्षा असलेली गुणपत्रिका येत्या दोन दिवसांत विद्यार्थ्यांच्या हाती पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नाशिक विभागीय मंडळाला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या (दहावी) अर्थात गुणपत्रिका गुरुवारी रात्र प्राप्त झाल्या असून, विभागीय मंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून रात्री उशिरापर्यंत या गुणपत्रिकांचे जिल्हानिहाय वर्गीकरण करण्याचे काम सुरू होते.
नाशिक : दहावीच्या निकालानंतर उत्तीर्ण झालेल्या दोन लाख विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेचा अर्ज दाखल करण्यासाठी प्रतीक्षा असलेली गुणपत्रिका येत्या दोन दिवसांत विद्यार्थ्यांच्या हाती पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नाशिक विभागीय मंडळाला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या (दहावी) अर्थात गुणपत्रिका गुरुवारी रात्र प्राप्त झाल्या असून, विभागीय मंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून रात्री उशिरापर्यंत या गुणपत्रिकांचे जिल्हानिहाय वर्गीकरण करण्याचे काम सुरू होते.
दहावीचा निकाल शनिवारी (दि.८) जाहीर झाला असून, यावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत दहावीच्या निकालात तब्बल ९.८४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी या विद्यार्थ्यांना जुलै महिन्यात पुन्हा पुरवणी परीक्षा देण्याची संधी आहे.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही गुणपत्रिकांची प्रतीक्षा असून, आगामी दोन ते तीन दिवसांत विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये गुणपत्रिका प्राप्त होऊ शकणार आहे. त्यासाठी विभागीय मंडळांकडून जिल्हा, तालुका, केंद्र आणि शाळानिहाय विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांची पाकिटे भरण्याचे काम सुरू आहे.
४महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव या चारही जिल्ह्यांत दि. ११ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत प्रात्यक्षिक, तर दि. १ ते २२ मार्च या कालावधीत ४३३ परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षांचे एकत्रिक गुणपत्रक विभागीय कार्यालयाला पोहच झाले आहेत.