एटीमकार्डची माहिती मिळवून साडेपाच लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 05:15 PM2018-12-26T17:15:14+5:302018-12-26T17:15:51+5:30
नाशिक : एटीम कार्ड व पिनकोडची माहिती विचारून घेत दहा जणांना साडेपाच लाख रुपयांना आॅनलाईन गडविल्याची प्रकार उघडकीस आला आहे़
नाशिक : एटीम कार्ड व पिनकोडची माहिती विचारून घेत दहा जणांना साडेपाच लाख रुपयांना आॅनलाईन गडविल्याची प्रकार उघडकीस आला आहे़
शबाना मेहबूब तांबाळी (५१, समता चौक, गणेश चौक, सिडको) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १० सप्टेंबर २०१७ ते २० सप्टेंबर २०१८ या कालावधीत अज्ञात संशयिताने वेळोवेळी फोन करून त्यांचे व ऋषिकेश सोपान गायकवाड, डिजीयन जुनादर, सुरेश नाबा बागूल, मंजुळा के नागदेव, साधना रविराज वाघ, मोहम्मद रफी इमाम खान, अशोक प्रभाकर काथार, सरला विजय खैरनार व सुनील चंद्रकांत जाधव यांच्या बँक खात्यातून इंटरनेटद्वारे ५ लाख ४० हजार २६१ रुपये वेळोवेळी काढून घेतले़
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़