उद्योजक होण्यासाठी आधी अंत:प्रेरित व्हा सुधीर मुतालिक : उद्योजकता आणि विकास यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:36 AM2018-02-07T00:36:29+5:302018-02-07T00:36:55+5:30
चांदवड : येथील स्व. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांना उद्योजक सुधीर मुतालिक यांनी इंटरप्रेन्यूअरशीप अॅण्ड डेव्हलपमेंट या विषयावर मार्गदर्शन केले.
चांदवड : येथील स्व. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांना उद्योजक सुधीर मुतालिक यांनी इंटरप्रेन्यूअरशीप अॅण्ड डेव्हलपमेंट या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे होते. व्यासपीठावर विभागप्रमुख डॉ. एस. डी. संचेती उपस्थित होते. अनेक विद्यार्थ्यांना उद्योजक व्हायचे असते; मात्र माझ्याकडे मुबलक आर्थिक पाठबळ नाही किंवा मला उद्योजकीय वारसा नाही, या भीतीपोटी अनेक विद्यार्थी उद्योजकीय गुण अंगात असतानाही पुढे सरसावत नाही. उद्योजक होण्यासाठी पैसा लागतो हे खरे आहे; पण पैसा हेच सर्वस्व नाही. त्यासाठी आधी तुम्ही अंतर्मनातून प्रेरित होणे गरजेचे आहे, असे मुतालिक यांनी सांगितले. विभागप्रमुख डॉ.एस.डी. संचेती यांनी सुधीर मुतालिक यांची ओळख करून दिली. ईडीसी सेल आणि इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग इंडिया स्टुंडट चापटर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रत्येक मनुष्यामध्ये एक सुप्त असा उद्योजक लपलेला आहे. तुम्हाला फक्त त्याला जागे करायचे आहे. उद्योजक हा एका रात्रीतून घडत नसतो. तो येणाºया आव्हानांचा सामना करत त्यातून मार्ग काढत अनुभवाच्या जोरावर रोज घडत जातो. यासाठी तुमच्या जवळ असणाºया साधनसामग्रीवर व ज्ञानावर विश्वास ठेऊन सुरुवात करा, जिद्द बाळगा, होणाºया चुका सुधारा, मागच्या चुकांमधून नवीन शिका, असे केल्यास नक्कीच उद्योजकेतेचे रोपटे वटवृक्षात रुपांतरित झाल्याशिवाय राहणार नाही, असे मुतालिक यांनी सांगितले.