मराठीला अभिजात दर्जा मिळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:21 AM2019-05-23T00:21:40+5:302019-05-23T00:22:25+5:30
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे केली.
नाशिकरोड : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे केली.
मसापच्या नाशिकरोड शाखेच्या शिष्टमंडळाने नुकतीच राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यावर चर्चा केली. केंद्र सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा यासाठी योग्य ती शिफारस राज्यपालांनी करावी, असे निवेदनात म्हटले आहे. मराठी भाषेचा देदीप्यमान इतिहास, मराठीला अभिजात भाषेची रास्त मागणी, प्रस्तावाचा प्रवास आणि केंद्र शासनाची भूमिका याबाबत शाखेचे कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव यांचा सत्कार करण्यात आला.
शिष्टमंडळात लेखक रमेश पतंगे, कार्यवाह रवींद्र मालुंजकर, कोषाध्यक्ष सुदाम सातभाई, सदस्य दशरथ लोखंडे, शिवाजी म्हस्के, पांडुरंग चव्हाण, राहुल बोराडे, जयंत गायधनी, सुशांत उबाळे, पंडित आवारे, शिवाजी बोराडे आदी सहभागी झाले होते.