निवडणुकीच्यावेळी पोतडीतल्या गोष्टी बाहेर काढू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 04:07 PM2018-12-20T16:07:05+5:302018-12-20T16:07:23+5:30

राज ठाकरे : पेठ येथील दौ-यात नागरिकांशी संवाद

Get out of the closet during election! | निवडणुकीच्यावेळी पोतडीतल्या गोष्टी बाहेर काढू!

निवडणुकीच्यावेळी पोतडीतल्या गोष्टी बाहेर काढू!

Next
ठळक मुद्दे राज यांनी कांदा प्रश्नी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करत सत्तेत बसलेल्या लोकांना निवेदनाची भाषा कळत नसल्याचे सांगितले

पेठ : आपल्या पोतडीत काय काय गोष्टी आहेत, त्या निवडणुकीच्यावेळी बाहेर काढू, असा इशारा देत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पेठ तालुक्यातील नागरिकांशी संवाद साधला. याचवेळी, राज्य सरकारने कांद्याला दर क्विंटलमागे जाहीर केलेल्या २०० रुपये अनुदानाबाबत आपण समाधानी नसल्याचेही राज यांनी सांगत शेतक-यांसाठी आंदोलनाचे संकेत दिले.
राज ठाकरे यांनी गुरु वारी (दि.२०) पेठ तालुक्याचा दौरा करून शेतक-यांसह व्यापारी व इतर संघटनांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. यावेळी, राज यांनी कांदा प्रश्नी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करत सत्तेत बसलेल्या लोकांना निवेदनाची भाषा कळत नसल्याचे सांगितले. दरम्यान, राज ठाकरे पेठ दौ-यावर येणार असल्याने पेठसह दिंडोरी, हरसुल, सुरगाणा, ननाशी या भागातून मोठया प्रमाणावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यात्रा मैदानावर उभारलेल्या व्यासपीठावर त्यांनी जनतेशी संवाद साधतांनाच शेतक-यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधत शासनाला धारेवर धरले. जाहीर सभेचे नियोजन नसतांनाही केवळ तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत यांच्या आग्रहात्सव आपण व्यासपिठावर आलो असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर विश्रामगृहावर विविध सामाजिक संस्थासह शेतकरी, व्यापारी, पोलीस पाटील संघटना यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली. नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्ष मनोज घोंगे, कुमार मोंढे यांनी राज ठाकरे यांचे स्वागत केले. याप्रसंगी आमदार बाळा नांदगावकर, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, नगरसेवक सलिम शेख, प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, ग्रामीण जिल्हाध्यक्ष रतन कुमार इचम, अनंता सुर्यवंशी, उपाध्यक्ष मनोज ढिकले, तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत यांचेसह मनसे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Web Title: Get out of the closet during election!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.