बाहेर व्हा... इन्स्पेक्शन सुरू आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:45 AM2018-01-24T00:45:43+5:302018-01-24T00:46:08+5:30

जिल्हा परिषदेच्या दुसºया मजल्यावर असलेल्या प्राथमिक शिक्षण विभागात दुपारी तीनच्या सुमारास इन्स्पेक्शन सुरू असल्याचे सांगत तेथील शिपाई वर्गाने आलेल्या शिक्षकांना कक्षाबाहेर पिटाळले, तर काहींना थेट वरच्या मजल्यावर जा किंवा खाली निघून जा सांगत कक्ष मोकळा करून घेतला. यामुळे आलेल्या शिक्षकांना वाट पाहावी लागली, तर मिळालेल्या वागणुकीवरून काही शिक्षकांनी नाराजीही व्यक्त केली.

 Get out ... Inspection is on! | बाहेर व्हा... इन्स्पेक्शन सुरू आहे!

बाहेर व्हा... इन्स्पेक्शन सुरू आहे!

Next

नाशिक : जिल्हा परिषदेच्या दुसºया मजल्यावर असलेल्या प्राथमिक शिक्षण विभागात दुपारी तीनच्या सुमारास इन्स्पेक्शन सुरू असल्याचे सांगत तेथील शिपाई वर्गाने आलेल्या शिक्षकांना कक्षाबाहेर पिटाळले, तर काहींना थेट वरच्या मजल्यावर जा किंवा खाली निघून जा सांगत कक्ष मोकळा करून घेतला. यामुळे आलेल्या शिक्षकांना वाट पाहावी लागली, तर मिळालेल्या वागणुकीवरून काही शिक्षकांनी नाराजीही व्यक्त केली.  जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात दुपारच्या  सुमारास शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वैशाली झनकर यांना भेटण्यासाठी जिल्ह्णातील अनेक भागांतील शिक्षक आले होते, तर काही प्रकरणांची सुनावणी असल्याने सुनावणीसाठीही शिक्षक आलेले होते. परंतु विभागीय आयुक्तालयातून अधिकारी इन्स्पेक्शनला आल्याचे सांगत आलेल्या शिक्षकांना खाली निघून जाण्यास सांगण्यात आले. शिक्षण विभागात मॅडमची भेट घेण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला कार्यालयातून काहीवेळ निघून जाण्यास सांगण्यात आले.  इन्स्पेक्शन सुरू आहे तसेच विभागीय आयुक्तालयातील अधिकारी आले आहेत हे सर्व मान्य असले तरी आलेल्या अभ्यागतांना कक्ष खाली करण्यास सांगण्याचा उद्देश मात्र कुणाच्याही लक्षात आला नाही. नेमके असे का करण्यात आले आणि त्यामागची भूमिका काय? या प्रश्नाचे उत्तर मात्र आलेल्या शिक्षकांना मिळू शकले नाही. याबाबतची नाराजी या शिक्षकांनी उघड व्यक्त केली नसली तरी आपसांतील कुजबूज मात्र लपून राहिली नाही.  दरम्यान, या संदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकाºयांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
याप्रकरणी चौकशी केली असता विभागीय आयुक्तालय कार्यालयातील अतिरिक्त आयुक्त सुखदेव बनकर यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या कामकाजाची पाहणी केल्याचे समजले. सुमारे तासभर त्यांनी कामकाजाची पाहणी करून फाइल्सचीही तपासणी केली. परंतु हे इन्स्पेक्शन नियमित होते की त्याला काही विशेष कारण हे मात्र समजू शकले नाही.  प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षणाधिकाºयांना भेटण्यासाठी येणाºयांची संख्या मोठी असते. सकाळापासून जिल्हाभरातील अनेक शिक्षक येथे येतात. त्यांची कामे होईपर्यंत कित्येकदा त्यांना सायंकाळपर्यंत वाट पाहावी लागते. मंगळवारी अनेक शिक्षकांना अशीच वाट पाहावी लागली. 
बसण्याची व्यवस्थाच नाही
आलेल्या शिक्षकांना बसण्यासाठी येथे व्यवस्थाच करण्यात आलेली नाही. त्यामुळे नेहमीच कार्यालयाच्या आवारात गर्दी दिसते. काही शिक्षक तेथेच मांडी घालतात, तर काही शिक्षक कार्यालयाबाहेरील जिन्यांच्या पायºयांवर बसतात. शिक्षकांना बसण्यासाठी व्यवस्थित जागा आणि पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली असती तर असे कितीही इन्स्पेक्शन झाले असते तरी शिक्षकांची गैरसोय टळली असती.

Web Title:  Get out ... Inspection is on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.