स्वबळावर लढण्यासाठी सज्ज व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:41 AM2017-10-30T00:41:19+5:302017-10-30T00:41:24+5:30

नाशिकमध्ये सत्ता नसतानाही शिवसेनेचे नगरसेवक नाशिकचा चेहरा बदलण्याचे काम करीत असून, असेच कार्य पुढे सुरू ठेवत विधानसभा स्वबळावर लढण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शिवसेना संपर्क नेते संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना केले.

Get ready to fight on your own | स्वबळावर लढण्यासाठी सज्ज व्हा

स्वबळावर लढण्यासाठी सज्ज व्हा

Next

सिडको : नाशिकमध्ये सत्ता नसतानाही शिवसेनेचे नगरसेवक नाशिकचा चेहरा बदलण्याचे काम करीत असून, असेच कार्य पुढे सुरू ठेवत विधानसभा स्वबळावर लढण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शिवसेना संपर्क नेते संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना केले.  सिडको प्रभाग क्रमांक २५ मध्ये आयोजित विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी खासदार राऊत बोलत होते. व्यासपीठावर संपर्कप्रमुख अजय चौधरी, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाला तांबडे, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, महिला आघाडी प्रमुख सत्यभामा गाडेकर, नरेंद्र दराडे, सिडको प्रभाग सभापती सुदाम डेमसे, माजी सिडको प्रभाग सभापती कल्पना पांडे आदी उपस्थित होते.  यावेळी खासदार राऊत म्हणाले की, कुटुंबात मतभेत असू शकतात, परंतु मनभेद नसतात, याच पद्धतीने नाशिकमध्ये पक्ष कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या तक्रारी न करता यापुढील काळातही सर्वांनी एकदिलाने कार्य सुरू ठेवत विधानसभा स्वबळावर लढण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे, असे आवाहन केले. यापूर्र्वी काय झाले, काय घडले याचा विचार सोडून आगामी आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे असेही ते म्हणाले. शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असलेले कार्य नाशिक शहरात नगरसेवक सुधाकर बडगुजर व हर्षा बडगुजर यांच्याकडून सुरू असल्याने त्यांच्या कार्याचा गौरव होणे हे स्वाभाविकच आहे. महापालिका प्रशासनाकडून काम करून घेणे हे अवघड असून, हे काम करण्यात बडगुजरांचा हात कोणी धरू शकत नसल्याचे राऊत म्हणाले. प्रास्ताविकात नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.  प्रास्ताविकात नगरसेवक सुधाकर बडगुजर म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार व संपर्क नेत्याच्या सूचनेनुसार मी संघटेनेचे काम करीत असून, वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करीत सर्व जबाबदाºया पार पाडत असून, वेळप्रसंगी यासाठी आंदोलनेदेखील केली. शिवसेनाच्या माध्यमातून नागरिकांना अभिप्रेत असलेली विकासकामे प्रभागात राबवित असल्याचेही त्यांनी सांगितले.  यावेळी नगरसेवक श्यामकुमार साबळे, दिलीप दातीर, दीपक दातीर, हर्षदा गायकर, सुभाष गायधनी, नाना पाटील, गोपी गिलबिले, गणेश जाधव, पवन मटाले, पंकज जाधव, अंकुश शेवाळे, पंकज तिडके, पिंटू भामरे, नितीन परदेशी, सुरेश होळकर, रमेश जावरे, त्र्यंबक गांगुर्डे, हरिभाऊ आढाव, नाना निकम, गोपीनाथ सोनवणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वाती पेटकर यांनी तर आभार नगरसेवक हर्षा बडगुजर यांनी मानले. दरम्यान, शहरांमध्ये विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात शिवसेना नेते संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांशी संपर्क साधून चर्चा केली. सामनगाव, जेलरोड, पाथर्डीफाटा आदि ठिकाणी कार्यकर्त्यांशी बोलताना निवडणूकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
चांगल्या कामाचा गौरव थांबवू शकत नाही : चौधरी
शिवसेना संपर्कप्रमुख अजय चौधरी यांनी सांगितले की शिवसेनाप्रमुख कायम सांगत होते की शिवसैनिक हा रडणारा नाही तर लढणारा असतो. शिवसेना एक कुटुंब असून, सर्वांनी चांगले काम करत रहावे, आपण केलेल्या चांगल्या कामाचा गौरव हा कोणीही थांबवू शकत नाही. असेही शेवटी चौधरी यांनी सांगितले.

Web Title: Get ready to fight on your own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.