योग्य आहाराद्वारे मिळवा निरामय आरोग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:10 AM2017-10-26T00:10:51+5:302017-10-26T00:29:44+5:30
पहाटे-रात्री सुरू असलेला गारव्याचा खेळ, फळे भाज्यांवर होत असलेली जंतुनाशकांची फवारणी, वातावरणात वाढत चाललेले प्रदूषण, त्यामुळे वाढत जाणारे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण व पर्यायाने येणारे गुंतागुंतीचे आजार यामुळे मानवी जीवन क्लेशमय बनले आहे. या साºयांना योग्य आहाराद्वारे व प्रामुख्याने निसर्गोपचाराद्वारे सामोरे गेल्यास अनेक आरोयविषयक समस्या दूर होऊन आरोग्यसंपन्न असे यशस्वी जीवन जगता येईल.
नाशिक : पहाटे-रात्री सुरू असलेला गारव्याचा खेळ, फळे भाज्यांवर होत असलेली जंतुनाशकांची फवारणी, वातावरणात वाढत चाललेले प्रदूषण, त्यामुळे वाढत जाणारे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण व पर्यायाने येणारे गुंतागुंतीचे आजार यामुळे मानवी जीवन क्लेशमय बनले आहे. या साºयांना योग्य आहाराद्वारे व प्रामुख्याने निसर्गोपचाराद्वारे सामोरे गेल्यास अनेक आरोयविषयक समस्या दूर होऊन आरोग्यसंपन्न असे यशस्वी जीवन जगता येईल. निसर्गोपचाराचा सखोल अभ्यास करून त्याचे फायदे अनुभवावेत, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे. कृत्रिम व आरोग्यास हानिकारक पेयांऐवजी नैसर्गिक पेयांवर भर द्यावा, असा सूरही त्यांच्या बोलण्यातून अधोरेखित झाला आहे.
चहा, कॉफीऐवजी दूध, दही, ताक, सोलकढी यांचा वापर वाढवावा. फ्ल्यूसारख्या आजारांना दूर ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळी तांब्याच्या भांड्यात खडीसाखर, धणे, बडिशोप समप्रमाणात घ्यावे. त्यात पाणी टाकून ते झाकून ठेवावे. दुसºया दिवशी सकाळी हे पाणी तसेच किंवा गाळून प्यावे. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात. याशिवाय रात्री झोपताना डोळ्यावर गुलाबपाण्यात बुडवलेले कापसाचे बोळे ठेवावेत.
वाढते प्रदूषण, ताणतणाव, भेसळयुक्त आहार- विहार यापासून शरीराला स्वच्छ व सुरक्षित ठेवायचे असेल तर निसर्गनिर्मित आहारावर भर द्यावा. यामुळे शरीर या सर्व संकटांशी सामना करण्यास सज्ज होते. निसर्गाने आपल्या शरीरात सर्व व्यवस्था केली आहे. तहान लागणे, भूक लागणे, पोट भरणे, झोप येणे, जाग येणे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष होते. आहार हे आपल्या शरीराचे इंधन आहे. त्यामुळे त्याच्या वेळा पाळून, प्रकृतीदुसार सात्विक आहार घेतल्यास तसेच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळल्यास आरोग्य चांगले राहू शकते. आहाराबरोबरच योगासने, प्राणायाम, ध्यान असे व्यायामप्रकारही महत्त्वाचे आहेत. - सुनंदा सखदेव, निसर्गोपचार तज्ज्ञ
मिश्र हवामानात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. दही, ताक, पंजिरी यांचा आहारात समावेश करावा. फ्रीजमधील पाणी, बर्फ, कोल्ड्रिंक्स याऐवजी कोकम सरबत, लिंबू सरबत, वाळ्याचे सरबत, तुकुमराईची खीर अशा नैसर्गिक पेयांचे प्रमाण वाढवावे. उन्हातून आल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. थोडावेळ शरीर स्थिर झाल्यानंतर माठातले किंवा साधे पाणी प्यावे. पूर्वापार चालत आलेला गूळपाणी हा तर सर्वोत्तम पर्याय आहे.