भंगार बाजार हटविण्यासाठी बंदोबस्त मिळावा
By admin | Published: December 30, 2016 11:59 PM2016-12-30T23:59:00+5:302016-12-30T23:59:21+5:30
मागणी : पोलीस आयुक्तांना शिवसेनेच्या वतीने निवेदन
सिडको : सातपूर - अंबड लिंकरोड परिसरातील अनधिकृत भंगार बाजारावर कारवाई करण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त मिळावा यासाठी शिवसेनेच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. च्ांुचाळे शिवारातील सातपूर-अंबड लिंकरोड परिसरात असलेले अनधिकृत भंगार मार्केट हटविण्यासाठी मनपाने तयारी सुरू केली असून, यासाठी अधिक पोलीस बंदोबस्त मिळावा म्हणून महानगरप्रमुख अजय बोरस्ते, मनपा माजी सभागृह नेते दिलीप दातीर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. निवेदनात शहरातील भंगार मार्केट हे केवळ अनधिकृत नसून नाशिक शहराच्या आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील बनले आहे. हे भंगार मार्केट निघावे यासाठी शिवसेनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलने केली आहे. याप्रसंगी अजय बोरस्ते, दिलीप दातीर, भागवत आरोटे, सुधाकर जाधव, यशवंत पवार, रंजना जाधव, पुष्पावती पवार, संतोष वाटपाडे, अशोक जाधव आदि उपस्थित होते. (वार्ताहर)