द्राक्षबाग विम्याचा परतावा मिळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 11:40 PM2020-11-08T23:40:02+5:302020-11-09T01:14:14+5:30
नामपूर : बागलाण तालुक्यातील द्राक्षबाग शेतकऱ्यांना विम्याचा परतावा लवकर मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बागलाण तालुक्यातील द्राक्षबाग शेतकऱ्यांनी विविध कंपनीच्या माध्यमातून बँकेद्वारा विमा काढला. शेतकऱ्यांच्या कर्जप्रकारच्या वेळीच द्राक्षबागेचा विमा काढण्यात आला. परंतु दोन वर्षांपासून कोणताच विम्याचा परतावा शेतकऱ्यांना मिळाला नाही.

गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाले होते. परंतु काही शेतकऱ्यांना अतिशय अत्यल्प तर काहींना काहीच नुकसानभरपाई मिळाली नाही. विमा कंपन्याकडून उडवा उडवीची उत्तर दिली गेली. या संदर्भात कृषी अधिकारी, बागलाण एस. एस. पवार यांना मोसम प्रतिष्ठान, नामपूरच्या वतीने चौकशी करून द्राक्षबाग शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी निवेदन दिले आहे.
यावेळी जितेंद्र सूर्यवंशी, युवराज दाणी, गणेश खरोटे, राजू पांचाळ, सुनील निकुंभ, तारीक शेख, केदा सोनवणे, सुरेश कंकरेंज, अमोल पगार आदी उपस्थित होते.