लेटलतिफ भाजपा पदाधिकाऱ्यांसाठी ‘गेट बंद’

By admin | Published: January 3, 2017 11:36 PM2017-01-03T23:36:19+5:302017-01-03T23:36:40+5:30

बेशिस्तीकडून शिस्तीकडे : वीस पदाधिकारी ताटकळले

Gettif 'for BJP office bearers' | लेटलतिफ भाजपा पदाधिकाऱ्यांसाठी ‘गेट बंद’

लेटलतिफ भाजपा पदाधिकाऱ्यांसाठी ‘गेट बंद’

Next

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी बोलाविण्यात आलेल्या पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला विलंबाने आलेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांना अचानक सुरू झालेल्या शिस्तपर्वाचा फटका बसला. पंधरा ते वीस मिनिटे विलंबाने आलेल्या वीस ते पंचवीस पदाधिकाऱ्यांना वसंत स्मृतीत न घेता गेट बंद करण्यात आल्याने या पदाधिकाऱ्यांना गेटबाहेरच ताटकळत
रहावे लागले. बऱ्याच वेळानंतर शहराध्यक्षांना कणव आल्याने त्यांना आत घेण्यात आले.
भाजपा हा एकेकाळी शिस्तबद्ध पक्ष होता. आता सर्वपक्षीय आयारामांचे आगमन आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांनाच विलंबाने येऊन कार्यकर्त्यांना वेठीस धरण्याची सवय झाली. परिणामी पदाधिकारी आणि कार्यकर्ते साऱ्यांवरच निर्बंध शिथिल होत गेले आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांनी ते गृहीत धरले. परंतु मंगळवारी निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित सर्व पदाधिकारी आणि आघाडी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या निमित्ताने अचानक शिस्तपर्व सुरू झाले.
विशेष म्हणजे एरव्ही बैठकीस विलंबाने येणारे शहर आणि प्रदेशाचे प्रमुख पदाधिकारी स्वत:च वेळेत हजर झाले. सुमारे सव्वा अकरापर्यंत जितके पदाधिकारी होते. त्यांच्यातच बैठक सुरू करण्यात आली आणि नंतर तत्काळ बाहेरील गेट बंद करण्याचे फर्मान सोडण्यात आले. त्यानुसार गेटला ताळे ठोकून ते बंद करण्यात आले. त्यानंतर बैठकीला आलेल्या पदाधिकाऱ्यांनी घाईघाईने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र गेट बंद बघून त्यांना आश्चर्य वाटले, त्यावेळी त्यांना पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसारच गेट बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तब्बल वीस ते पंचवीस पदाधिकाऱ्यांना गेटच्या बाहेर ताटकळावे लागले. बऱ्याच वेळानंतर कोणा पदाधिकाऱ्याने शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांना दूरध्वनी केला. मग त्यांना कणव आल्यानंतर त्यांनी गेट उघडण्यास सांगितले. त्यानंतर ताटकळणाऱ्या पदाधिकाऱ्यांना प्रवेश मिळाला.

Web Title: Gettif 'for BJP office bearers'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.