नारी हर्ष फाउंडेशनतर्फे घंटागाडी कर्मचाऱ्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:11 AM2021-06-24T04:11:34+5:302021-06-24T04:11:34+5:30
यावेळी सिडको प्रभाग २७ आणि २९ मधील दीडशेहून अधिक परंतु कोविडमुळे प्रातिनिधिक स्वरूपात ४० घंटागाडी कामगार आणि सुपरवायझर यांचा ...
यावेळी सिडको प्रभाग २७ आणि २९ मधील दीडशेहून अधिक परंतु कोविडमुळे प्रातिनिधिक स्वरूपात ४० घंटागाडी कामगार आणि सुपरवायझर यांचा कोविडकाळातील कामगिरीबद्दल तांदूळ, मास्क, सॅनिटायझर किट, प्रशस्तीपत्र आणि आर्सेनिक अल्बम गोळ्या देऊन सन्मान करण्यात आला.
ऊन, वारा, पाऊस असला तरी कोणतीही कुरकूर न करता सिडको परिसर स्वच्छ ठेवण्याचे आणि नियमितपणे कचरा संकलनाचे काम घंटागाडी कामगार करीत असतात. नारी हर्ष फाउंडेशन तसेच भाजपने समाजातील दुर्बल घटकांना संकटकाळात नेहमीच मदतीचा हात पुढे केला असून सामाजिक बांधीलकीचा हा वसा कायम जोपासला जाईल, असा विश्वास डॉ. फिरोदिया यांनी व्यक्त केला. यावेळी आशिष फिरोदिया, राहुल गणोरे, पिंटू काळे, बाळासाहेब घुगे, सुषमा कथ्थार, जयश्री बोलिज, योगिता लांबघे, प्राजक्ता देशमुख आदी उपस्थित होते.
(फोटो २३ नारी) नारी हर्ष फाउंडेशनच्या वतीने घंटागाडी कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना हर्षा फिरोदिया, शिवाजी बरके, आशिष फिरोदिया,
राहुल गणोरे, पिंटू काळे, बाळासाहेब घुगे आदी.