घोटीकरांचा एल्गार : बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 11:41 PM2018-01-22T23:41:34+5:302018-01-23T00:21:30+5:30
शहरातील भंडारदरा मार्गावरील गुरुकृपा हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात अर्भकासह अकरा वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी मोर्चा काढला. ग्रामस्थांनी हातात फलक घेऊन दोषींवर कारवाई व्हावी अशा घोषणा दिल्या. घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, इगतपुरीचे पोलीस निरीक्षक संजय शुक्ला, गटविकास अधिकारी किरण जाधव यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
घोटी : शहरातील भंडारदरा मार्गावरील गुरुकृपा हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात अर्भकासह अकरा वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी मोर्चा काढला. ग्रामस्थांनी हातात फलक घेऊन दोषींवर कारवाई व्हावी अशा घोषणा दिल्या. घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस
निरीक्षक पंकज भालेराव, इगतपुरीचे पोलीस निरीक्षक संजय शुक्ला, गटविकास अधिकारी किरण जाधव यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. शहरातील महाराणा प्रताप चौकातील अश्विनी ज्ञानेश्वर भोर यांच्या प्रसूतीदरम्यान नवजात अर्भकाचा चुकीच्या उपचारपद्धतीने घेतलेला बळी व फांगुळगाव येथील शालेय विद्यार्थिनी कविता भाऊसाहेब दुभाषे हिच्या मृत्यू प्रकरणी संबंधित बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. यावेळी पोलिसांना निवेदन सादर करण्यात आले.
आजपर्यंत अनेक रुग्ण चुकीच्या उपचारपद्धतीमुळे दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देऊन संबंधित डॉक्टारांवर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, मनसेचे जिल्हा उपप्रमुख संदीप किर्वे, उपसभापती भगवान आडोळे, शिवसेनचे कुलदीप चौधरी, पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब पवार, युवक कॉँग्रेसचे भास्कर गुंजाळ, घोमकोचे माजी चेअरमन रामदास शेलार, अॅड. हनुमान मराडे, सिटूचे जिल्हा नेते देवीदास आडोळे, ज्ञानेश्वर भटाटे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष; बोगस डॉक्टरांची यादी
इगतपुरी तालुक्यासह त्र्यंबकेश्वरातील ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू आहे. रु ग्णालयाच्या पाटीवर भलत्याच डॉक्टचे नाव तर उपचार करणारे डॉक्टर भलतेच असे सर्रास चित्र पाहण्यास मिळत आहे. संबंधित यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे. मागील वर्षी जिल्हा प्रशासनाकडे तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून बोगस डॉक्टरांची यादी पाठविण्यात आली असतानादेखील कुठलीही कारवाई झालेली नाही. शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष यास कारणीभूत ठरत आहे, असा आरोप करण्यात आला आहे.