नाशिकमधील घरफोड्या; नेपाळमध्ये हॉटेल व्यावसायिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:11 AM2018-02-22T01:11:31+5:302018-02-22T01:12:50+5:30

नाशिकमध्ये घरफोडी केल्यानंतर नेपाळला पळून जायचे, त्या ठिकाणी हॉटेल खरेदी करायचे व पुन्हा पैशांची निकड भासली की नाशिकला घरफोडीसाठी परतणारा सराईत घरफोड्या संशयित गणेश भंडारे यास शहर गुन्ह शाखेच्या युनिट-१ ने अटक केली आहे़

Gharafoda in Nashik; Hotel commercial in Nepal | नाशिकमधील घरफोड्या; नेपाळमध्ये हॉटेल व्यावसायिक

नाशिकमधील घरफोड्या; नेपाळमध्ये हॉटेल व्यावसायिक

googlenewsNext

नाशिक : नाशिकमध्ये घरफोडी केल्यानंतर नेपाळला पळून जायचे, त्या ठिकाणी हॉटेल खरेदी करायचे व पुन्हा पैशांची निकड भासली की नाशिकला घरफोडीसाठी परतणारा सराईत घरफोड्या संशयित गणेश भंडारे यास शहर गुन्ह शाखेच्या युनिट-१ ने अटक केली आहे़ टागोरनगरमधील भरत गांग यांच्या बंगल्याच्या खिडकीचे गज कापून लाखो रुपयांचे दागिने चोरल्याच्या गुन्ह्यासह आणखी दोन गुन्ह्यांची कबुली संशयित भांडारे याने दिली असून, त्याच्याकडून १४ लाख रुपयांचे ५४७ ग्रॅम सोने हस्तगत केले आहे. चोरीचे सोने विकत घेणाºया मुंबईतील एका संशयितास अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी बुधवारी (दि़२१) पत्रकार परिषदेत दिली़ सिंगल यांनी सांगितले की, आॅक्टोबर २०१६ मध्ये टागोरनगरमध्ये भरत दीपचंद गांग यांच्या बंगल्याच्या खिडकीचे गज कापून लाखो रुपयांच्या सोन्याच्या दागिन्याची चोरी केल्याची घटना घडली होती़ संशयित गणेश भंडारे यानेच ही घरफोडी केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते, मात्र या घटनेनंतर तो नेपाळमध्ये फरार झाला होता़ नेपाळमध्ये त्याच्या शोधासाठी गेलेल्या पथकास गुंगारा देण्यात भंडारे यशस्वी झाला होता़ शहर गुन्हे शाखा युनिट-१ चे सहायक पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना भंडारे नाशिकमध्ये आल्याची माहिती मिळाली होती़ व्हॅलेंटाइन डे अर्थात १४ फेब्रुवारी रोजी युनिट एकने सीबीएस परिसरात भंडारे यास सापळा लावून अटक केली़  संशयित भंडारेची कसून चौकशी केल्यानंतर त्याने उपनगरमध्ये दोन तर गंगापूर पोलीस ठाण्यात एक अशा तीन घरफोड्यांची कबुली दिली़ घरफोडीतील चोरीचे सोने पॉलिश करून देणारा तसेच खरेदी करणारा मुंबईतील दीपक देवरुखकरची माहिती दिल्यानंतर त्यासही मुंबईतून अटक करण्यात आली आहे़ या दोघांकडून तीन घरफोड्यांमधील सुमारे १३ लाख ६७ हजार ५०० रुपयांचे ५४७ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे़  आयुक्त डॉ. सिंगल, उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक निरीक्षक नागेश मोहिते, महेश कुलकर्णी, दिलीप मोंढे, विशाल देवरे, स्वप्नील जुंद्रे, प्रवीण चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली़
रिसॉर्ट खरेदीसाठी पैशांची आवश्यकता
सराईत भंडारे याने नेपाळी युवतीशी विवाह केला व चोरीच्या पैशातून दोन हॉटेल खरेदी केले़ आणखी एक रिसोर्ट खरेदी करण्यासाठी त्यास पैशांची आवश्यकता असल्याने तो नाशिकला आला होता़ येथे घरफोडी करून त्या पैशातून हे रिसॉर्ट खरेदी करायचे होते. दरम्यान, नाशिक पोलिसांनी भंडारेच्या शोधासाठी इंटरपोलकडेही प्रस्ताव दिला होता.

Web Title: Gharafoda in Nashik; Hotel commercial in Nepal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.