पंचायत समितीला घरकुल योजनेचा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:49 AM2019-11-26T00:49:01+5:302019-11-26T00:55:26+5:30
त्र्यंबकेश्वर : ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना व घरकुल योजनेतील ९८ टक्के कामाचा टप्पा ओलांडत तालुक्यात प्रभावीपणे राबविल्याने राज्यस्तरीय पातळीवर गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांना अनुक्रमे दुसरे व चौथे बक्षीस त्र्यंबक पंचायत समितीला जाहीर झाल्याने त्यांचा मुंबईत राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना व घरकुल योजनेतील ९८ टक्के कामाचा टप्पा ओलांडत तालुक्यात प्रभावीपणे राबविल्याने राज्यस्तरीय पातळीवर गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांना अनुक्रमे दुसरे व चौथे बक्षीस त्र्यंबक पंचायत समितीला जाहीर झाल्याने त्यांचा मुंबईत राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
१४ मार्च २००२ रोजी त्र्यंबक पंचायत समितीची स्थापन झालेल्या त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे भाग्य उजळले असुन पंचायत समिती मार्फत राबविण्यात येणा-या दोन योजनांमध्ये पंचायत समिती पात्र ठरली. त्र्यंबकेश्वर पंचायत समितीतर्फे आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते गौरव सन्मान करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती कार्यालयात कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यात राज्यात व्दितीय क्र मांक व प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत प्रथम टप्पा ९८, टक्के घरकुल पूर्ण केले यात चौथा
क्र मांक असे यश त्र्यंबकेश्वर तालुक्याने मिळवले. या कामगिरीबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते व मुख्य सचिव अजोय मेहता यांचे उपस्थितीत त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांना मुंबई येथे गौरविण्यात आले.
दरम्यान , आमदार हिरामण खोसकर यांनी त्र्यंबकेश्वरला भेट दिली असता त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभापती ज्योती राऊत यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी उपसभापती अलका झोले, सदस्य रविंद्र भोये, देवराम मौळे, मोतीराम दिवे, मनाबाई भस्मा तसेच नियोजन समिती सदस्य इंजि.विनायक माळेकर आदी उपस्थित होते. सदस्यांनी तालुक्याच्या समस्या आमदार खोसकर याच्याकडे मांडल्या.
विकासासाठी सहकार्याचे आश्वासन खोसकर यांनी दिले. यावेळी गटशिक्षणाधिकारी राजेंद्र शिरसाट, तालुका आरोग्य अधिकारी योगेश मोरे, बालविकास प्रकल्प अधिकारी दिघोळे, त्र्यंबकेश्वर प्रकल्प व सागर वाघ यांचेसह अन्य कर्मचारी उपस्थित होते.