रस्ता कामाच्या निविदा रद्द करण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:10 AM2021-06-27T04:10:54+5:302021-06-27T04:10:54+5:30

सौंदाणे जिल्हा परिषद गटातील सौंदाणे-शिरसोंडी, वाके-सोनज, मुंगसे-सोनज या रस्त्यांची कामे नियोजन मंडळाकडून मंजूर करण्यात आली आहेत. या भागातील रस्ता ...

Ghat for cancellation of tender for road works | रस्ता कामाच्या निविदा रद्द करण्याचा घाट

रस्ता कामाच्या निविदा रद्द करण्याचा घाट

Next

सौंदाणे जिल्हा परिषद गटातील सौंदाणे-शिरसोंडी, वाके-सोनज, मुंगसे-सोनज या रस्त्यांची कामे नियोजन मंडळाकडून मंजूर करण्यात आली आहेत. या भागातील रस्ता कामे करण्याऐवजी मंजूर कामांची निविदा रद्द करण्याचा घाट रचला जात आहे. तिन्ही रस्ते दळणवळणासाठी महत्त्वाचे आहेत. नागरिकांनी वारंवार मागणी केल्यानंतर या रस्त्यांचा डीपीडीसीमध्ये समावेश करण्यात आला. मात्र, या गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी सर्वसाधारण सभेत निविदा रद्द करण्याचा विषय मांडला आहे. या प्रकाराचा निषेध करण्यात आला आहे. याबाबत शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा उपप्रमुख संग्राम बच्छाव यांनी मुख्य कार्यकारी अभियंता लीना बनसोड यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.

इन्फो

कामे पळविल्याचा आरोप

बच्छाव यांच्यासह किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पंकज शेवाळे, सावकारवाडीचे सरपंच वैभव साळुंके, आबासाहेब साळुंके, झाडीचे सरपंच माणिक नेमणार, टाकळीचे सरपंच महेंद्र सोनवणे, मांजरेचे सरपंच जयकुमार निकम, एरंडगावचे अशोक निकम, वऱ्हाणेचे अरुण अहिरे, पंकज सोनवणे, भाऊसाहेब पवार, रतन हलवर, योगेश सूर्यवंशी आदींनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. ७० लाखांची कामे इतर ठिकाणी पळविल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Web Title: Ghat for cancellation of tender for road works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.