महाराष्ट्रचे पाणी गुजरातला देण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 04:47 PM2019-07-20T16:47:46+5:302019-07-20T16:48:09+5:30

नितीन भोसले : नार-पार अभ्यास शिबिरात आरोप

 Ghat to give Maharashtra water to Gujarat | महाराष्ट्रचे पाणी गुजरातला देण्याचा घाट

महाराष्ट्रचे पाणी गुजरातला देण्याचा घाट

Next
ठळक मुद्देनार- पार जलहक्क समितीने गेले १४-१५ महिने तालुक्याच्या खेडोपाडी चालविले जलजागर अभियान

साकोरा : गुजरात राज्यातील कच्छ आणि सौराष्ट्र भागातील सिंचनासाठी १३३० द.ल.घ.मी. पाणी वळविण्याचे प्रस्तावित असून महाराष्ट्र राज्यातील ४३४ द.ल.घ.फूट पाणी तापी खोऱ्यातील उकाई धरणात वळविले जाणार आहे. यावरून महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातला देण्याचा घाट घातला जात असून मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री जनतेची दिशाभूल करील आहेत, असा आरोप माजी आमदार तथा ‘पाणी यात्रा’चे संस्थापक अध्यक्ष नितीन भोसले यांनी नांदगाव तालुका नार-पार जलहक्क समितीने आयोजित केलेल्या नार -पार प्रकल्प अभ्यास शिबिरात बोलताना केला.
नार- पार जलहक्क समितीने गेले १४-१५ महिने तालुक्याच्या खेडोपाडी चालविलेले जलजागर अभियान महत्वाचे असून समितीने या अभियानास तालुक्याच्या पलीकडे नेवून व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करावेत. आज नार-पारचे संपूर्ण पाणीच गुजरातला नेले जात असताना जर आडातच नसेल तर पोह-यात कसे येणार, याचा दूरवर विचार करून राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन पाण्यासाठी जो प्रामाणकिपणे प्रयत्न करेल, त्यालाच जनतेने निवडून द्यावे, असे आवाहनही नितीन भोसले यांनी यावेळी केले. आम आदमी पक्षाचे विशाल वडघुले यांनी प्रास्ताविक केले तर मनसेचे योगेश सोनार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन सोमनाथ तळेकर यांनी केले.यावेळी भास्कर कदम, राजेंद्र गुप्ता, पुंडलिक कचरे,योगेश बोदडे, सचिन मालेगावकर, मनसेचे कांती चौबे, काळे यांचेसह गावोगावचे सरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरेश वाघ,रामदास पगारे,दिलीप निकम,शिवाजी जाधव,परशराम शिंदे,निलेश चव्हाण,सचिन कोल्हे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

Web Title:  Ghat to give Maharashtra water to Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.