सप्तश्रृंगगडावरील अपघाताचे व्हायरल छायाचित्र चुकीचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 03:30 PM2019-12-12T15:30:50+5:302019-12-12T15:32:12+5:30
सप्तशृंगगड : मागील दोन दिवसांपासून पुर्वी कुणी तरी अन्यात व्यक्तीने सप्तशृंगगड असा नामउल्लेख करून दुसऱ्या एखाद्या घाट रस्त्यावर झालेल्या वाहन अपघाताचे छायाचित्र व्हॉटसपद्वारे व्हायरल केले आहेत.त्यामुळे भाविक व नागरिकांमध्ये या घटनेबद्दल गैरसमज निर्माण झालेला आहे.
सप्तशृंगगड : मागील दोन दिवसांपासून पुर्वी कुणी तरी अन्यात व्यक्तीने सप्तशृंगगड असा नामउल्लेख करून दुसऱ्या एखाद्या घाट रस्त्यावर झालेल्या वाहन अपघाताचे छायाचित्र व्हॉटसपद्वारे व्हायरल केले आहेत.त्यामुळे भाविक व नागरिकांमध्ये या घटनेबद्दल गैरसमज निर्माण झालेला आहे.
भाविक वर्गाने या बाबत गडावरील ग्रामस्थांना, निवासिनी देवी ट्रस्ट,एस.टी.डेपो, पोलिस अधिकारी, याबाबत दूरध्वनी वरून इतरत्र अपघात बाबतची माहितीची विचारणा केली जात आहे. त्यामुळे अशा घटनांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन कळवणचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ व सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी केले आहे.
श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे जाणारा घाट रस्ता सुरक्षित असून घाटरस्ता दरम्यान कोठेही व कोणत्याही प्रकारच्या वाहन अपघाताची घटना घडलेली नाही. त्यामुळे भाविक व नागरिकांना विनंती करण्यात येते की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व आपल्या दूरध्वनीवर इतरांनी पाठविण्यात आलेल्या चुकीच्या माहितीचे तपशील अथवा छायाचित्र बाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याशिवाय ते इतरत्र पाठवू नये. तसेच कोणत्याही तिर्थक्षेत्र अथवा ठिकाणासंदर्भात अशा आशयाच्या माहितीवर संपूर्ण खात्री करण्यासाठी संबंधित ट्रस्ट कार्यालय, स्थानिक ग्रामपालिका, पोलीस ठाणे अथवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय तालुका आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाशी आवश्यक तो समन्वय साधून त्या बाबतची अधिकृत माहिती प्राप्त करून घ्यावी व्हॉट्सअप व सोशल नेटवर्कवरील अनधिकृत तपशील तसेच अफवा बाबत कोणतीही अधिकृत खात्री न करता विश्वास ठेवून सदरची माहिती इतरत्र पाठवू नये असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.