पंचवटीत वृक्षतोडीचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 09:56 PM2020-07-20T21:56:15+5:302020-07-21T02:05:47+5:30

नाशिक : शहरातील पंचवटी परिसरात वृक्षतोडीची तयारी महापालिकेने सुरू केली असून, त्यासाठी मुदत उलटल्यानंतर झाडांना नोटिसा चिकटवण्यात आल्या आहेत. त्यामुळे वृक्षप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात वृक्षप्रेमी अश्विनी भट यांनी महापालिकेकडे हरकत नोंदवली आहे.

Ghat of tree felling in Panchavati | पंचवटीत वृक्षतोडीचा घाट

पंचवटीत वृक्षतोडीचा घाट

Next

नाशिक : शहरातील पंचवटी परिसरात वृक्षतोडीची तयारी महापालिकेने सुरू केली असून, त्यासाठी मुदत उलटल्यानंतर झाडांना नोटिसा चिकटवण्यात आल्या आहेत. त्यामुळे वृक्षप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात वृक्षप्रेमी अश्विनी भट यांनी महापालिकेकडे हरकत नोंदवली आहे.
सध्या कोरोनामुळे लॉकडॉऊनचे वातावरण असताना मनपाच्या वतीने वृक्षतोडीचे काम अत्यावश्यक असल्याचे दाखवून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पंचवटीत धोकादायक वाळलेले आणि बांधकाम बाधित वृक्ष तोडण्यासाठी मनपाने हरकती आणि सूचना मागविल्या आहेत, मात्र त्यासाठी दिलेली मुदत ७ जुलैला संपल्यानंतर झाडांवर नोटिसा लावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे काही झाडांवर पक्षांची घरटी असल्याने नियमानुसार अशाप्रकारे झाडे तोडण्यास मनाई आहे, मात्र नियम डावलून वड, पिंपळ, उंबर, नांद्रुक अशा प्रजातींच्या वृक्षांची छाटणी करण्यात येणार आहे. वृक्षतोडीच्या अगोदर मनपाने वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात असे वृक्षारोपण केले नसल्याची तक्रार अश्विनी भट यांनी केली आहे.
---------------
महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयातदेखील अश्विनी भट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हरकती नोंदवल्या असून, महापालिकेने घाईघाईने वृक्षतोड करू नये तसेच नियमांचे पालन करावे, अशी मागणी केली आहे.

 

Web Title: Ghat of tree felling in Panchavati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक