देशवंडी नदीवर होणार घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 01:13 AM2018-08-23T01:13:51+5:302018-08-23T01:14:52+5:30
नायगाव : सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे विविध विकासकामांबरोबर नदीवर बांधल्या जाणाºया घाटबांधणीमुळे गावाचा चेहरा बदलणार असल्याची माहिती सरपंच वनीता कापडी यांनी दिली.
नायगाव : सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे विविध विकासकामांबरोबर नदीवर बांधल्या जाणाºया घाटबांधणीमुळे गावाचा चेहरा बदलणार असल्याची माहिती सरपंच वनीता कापडी यांनी दिली.
लोककवी वामनदादा कर्डक यांचे जन्मगाव असलेल्या देशवंडी येथे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांचे निवारण होणार असून, दक्षिण-उत्तर वाहणाºया नदीवर ऐतिहासिक असे घाटाचे बांधकाम होणार आहे.
देशवंडी गावात खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता सानप यांच्या विविध निधीतून गाव परिसरातील अंतर्गत रस्ते, देशवंडी - महादेव नगर रस्ता व पूल, सभामंडप, दशक्रि या विधी शेड आदींसह विविध प्रलंबित असलेल्या समस्या लवकरच सुटणार असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. आजपर्यंत शासनाच्या विविध निधीच्या माध्यमातून गावात अनेक विकासकामे झाली आहेत. सध्या मंजूर झालेल्या निधीमध्ये गावात होणाºया विकासकामांबरोबर नदीवर बांधल्या जाणाºया घाटामुळे देशवंडी गावाचा चेहरा बदलणार असल्याचे कापडी यांनी सांगितले. लवकरच संबंधित कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात अनेक कामे झाली असून, संबंधित लोकप्रतिनिधींच्या निधीतून अनेक विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. लवकरच या विकासकामांची प्रत्यक्षात कामाला सुरुवात होऊन देशवंडी गावाचा चेहरा बदलण्यास वेळ लागणार नाही. सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्याने देशवंडीचा विकास होणार आहे.
- वनीता कापडी, सरपंच