१२ मतदारसंघांच्या टक्केवारीत घट; निफाड, कळवणला वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 01:09 AM2019-10-24T01:09:36+5:302019-10-24T01:10:18+5:30
Maharashtra Assembly Election 2019विधानसभा निवडणुकीत गेल्या वर्षीचा मतांचा विक्रम वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करूनही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान कमी झाले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नाशिक जिल्ह्यातील पंधरा पैकी १२ मतदारसंघात टक्केवारीत घट झाली आहे, तर तीन मतदारसंघात मतांचा टक्का काहीसा वाढला आहे.
नाशिक : विधानसभा निवडणुकीत गेल्या वर्षीचा मतांचा विक्रम वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करूनही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान कमी झाले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नाशिक जिल्ह्यातील पंधरा पैकी १२ मतदारसंघात टक्केवारीत घट झाली आहे, तर तीन मतदारसंघात मतांचा टक्का काहीसा वाढला आहे.
निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला पाहिजे तरच लोकशाहीचा तो खरा कौल ठरू शकतो. या दृष्टीने निवडणूक आयोग प्रयत्न करीत असताना मात्र नुकत्याच झालेल्या मतमोजणीत नाशिक जिल्ह्यात सरासरी मतदानाची टक्केवारी घटली आहे.
त्याचप्रमाणे जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांपैकी केवळ कळवण, निफाड आणि देवळाली मतदारसंघात मात्र मतांची टक्केवारी वाढली आहे. कळवण मतदारसंघात १४ टक्के, निफाड मतदारसंघात २.६० टक्के, तर देवळाली मतदारसंघात ७४ टक्के इतकी अल्पशी वाढ झाली आहे. मतदानाची सर्वांत कमी टक्केवारी नाशिक शहरातील मध्य नाशिक मतदारसंघात आहे.
२०१४ मध्ये या मतदारसंघात ५१.७३ टक्केमतदान झाले होते. यंदा मात्र ४८.४० टक्के इतके मतदान झाले आहे.