घाटनदेवी परिसर उजळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 01:17 AM2018-10-15T01:17:57+5:302018-10-15T01:18:23+5:30
इगतपुरी : तालुक्याची ग्रामदेवता आराध्य दैवत घाटन देवी मंदिर परिसरात नवरात्रोत्सवात लाखोच्या संख्येने भक्तगण देवीसमोर नतमस्तक होण्यासाठी तसेच नवसपूर्तीसाठी येत असतात. चारही दिशेला प्रखर उजेड पडेल असा मोठा हायमास्ट उभा केला. त्यामुळे परिसर उजळून निघाला.
इगतपुरी : तालुक्याची ग्रामदेवता आराध्य दैवत घाटन देवी मंदिर परिसरात नवरात्रोत्सवात लाखोच्या संख्येने भक्तगण देवीसमोर नतमस्तक होण्यासाठी तसेच नवसपूर्तीसाठी येत असतात. मंदिरासमोर कमी प्रमाणात प्रकाश असून काही भागात अंधार असतो. ज्ञानेश्वर लहाने यांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोरख बोडके यांना याबाबत माहिती दिली. गोरख बोडके यांनी अवघ्या काही तासात येथे चारही दिशेला प्रखर उजेड पडेल असा मोठा हायमास्ट उभा केला. त्यामुळे परिसर उजळून निघाला. घाटनदेवी परिसर पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित व्हावा याकरिता पी.के. ग्रुपचे संस्थापक प्रशांत कडू व गोरख बोडके यांच्यासह सहकारी प्रयत्नशील असल्याचे कडू यांनी सांगितले. याप्रसंगी अॅड. संदीप गुळवे, ताराचंद भरिंडवाल, रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गुप्ता, पोपट भागडे, संजय खातळे, माणिक भरिंडवाल, अॅड. सुभाष भरिंडवाल उपस्थित होते.