इगतपुरी तालुक्यात घरकुल वाटपात घोळ
By Admin | Published: August 25, 2016 11:53 PM2016-08-25T23:53:17+5:302016-08-25T23:55:55+5:30
तहसीलदारांना निवेदन : यादीच्या फेरसर्वेक्षणाची मागणी
घोटी : इगतपुरी तालुक्यात इंदिरा आवास घरकुल योजनेत मूळ लाभार्थी आणि गरजूंना डावलून सधन असलेल्या व ज्यांच्याजवळ पक्की व भक्कम घरे आहेत अशा व्यक्तींना घरकुलाचा लाभ देण्यात आला असून, शासनाने या यादीचे फेरसर्वेक्षण करून खऱ्या लाभार्थींस घरकुलाचा लाभ द्यावा, अशा मागणीचे निवेदन तहसील अनिल पुरे यांना देण्यात आले
आहे.
याबाबत तालुक्यातील वाघेरे येथील ग्रामस्थांनी तहसीलदार अनिल पुरे यांची भेट घेऊन वाघेरे येथील विशेष ग्रामसभा घेण्यास टाळाटाळ केली जात असून, जातनिहाय सर्वेक्षणाची चौकशी व्हावी, घरकुल योजनेचा सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ देण्यात आला आह़े तसेच ही घरकुले पात्र लाभार्थींना मिळण्यासाठी फेरसर्वेक्षण करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या शिष्टमंडळात प्रभाकर चिकने, एकनाथ भोसले, पप्पू भोसले, दिनकर चिकने, दशरथ धोंगडे, दगडू जाधव, भागूबाई धोंडे, राहुल किर्वे, भास्कर हिलम, संपत डोखे, शिवाजी चिकने, सत्यभामा आंबेकर, प्रकाश भोर आदिंचा समावेश होता. (वार्ताहर)