घोटी पोलिसांकडून हातभट्टी उध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 04:30 PM2019-09-23T16:30:01+5:302019-09-23T16:30:14+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील खैरगाव भागातील मोराचा डोंगर शिदवाडी येथे घोटी पोलिसांनी हातभट्टी उध्वस्त केली.
घोटी : इगतपुरी तालुक्यातील खैरगाव भागातील मोराचा डोंगर शिदवाडी येथे घोटी पोलिसांनी हातभट्टी उध्वस्त केली. बेकायदा गावठी दारू तयार करण्याचा अड्डा नेस्तनाबूत करण्यात आला. या छाप्यात ७७ हजारांचा मुद्धेमाल ताब्यात घेण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी अरु ंधती माने, पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी केली. रविवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
इगतपुरी तालुक्यातील खैरगाव या भागात जंगली परिसर आहे. या भागातील मोराचा डोंगर शिदवाडी भागात बेकायदा गावठी दारू तयार करणारा अड्डा असल्याची गुप्त माहिती घोटी पोलिसांना मिळाली. याबाबत पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अरु ंधती माने, पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांचे मार्गदर्शन घेतले. त्यानुसार रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घोटी पोलिसांच्या पथकाने अड्ड्यावर छापा मारला. या छाप्यात गावठी दारू बनवण्याचे विविध साहित्य जप्त करण्यात आले. या साहित्याची किंमत ७७ हजार ५० रु पये आहे. यासह हा अड्डा उध्वस्त करण्यात आला. अड्डा चालवणारे अज्ञात इसम फरार झाले. अज्ञातांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कामगिरीत उपनिरीक्षक अनिल धुमसे, संदीप मथुरे, शीतल गायकवाड, संतोष दोंदे यांनी सहभाग घेतला.