वावीच्या स्री स्वाभिमान केंद्राचे ‘घे भरारी‘ आरोग्य अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:49 AM2021-02-05T05:49:39+5:302021-02-05T05:49:39+5:30
वावी : येथील स्री स्वाभिमान केंद्राच्या वतीने अकोले तालुक्यातील टाहकरी येथील कर्मवीर भाऊराव पाटील शैक्षणिक संस्थेच्या अंबिका विद्यालयात ...
वावी : येथील स्री स्वाभिमान केंद्राच्या वतीने अकोले तालुक्यातील टाहकरी येथील कर्मवीर भाऊराव पाटील शैक्षणिक संस्थेच्या अंबिका विद्यालयात ‘घे भरारी’ आरोग्य अभियान राबविण्यात आले. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त वावीच्या स्री स्वाभिमान सॅनिटरी नॅपकिन्स उत्पादन केंद्राच्या वतीने आदिवासीप्रवण क्षेत्रात येणाऱ्या या विद्यालयात शालेय विद्यार्थिनींची मासिक धर्मातील स्वच्छता पॅडची निकड ओळखून अभियान राबविण्यात आले. वावी येथील दिव्यांग उद्योजक रवि सुपेकर यांनी सर्व विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स वितरित केले. या उपक्रमात मुख्याध्यापक गोरक्षनाथ वाकचौरे व प्रमिला एखंडे यांच्या उपस्थितीत सुपेकर यांनी पर्यावरणपूरक स्वच्छता पॅड हे रासायनिक व प्लॅस्टिकविरहित असल्याने भविष्यात उद्भवणाऱ्या दुर्धर रोगांपासून वाचविण्यासाठी अतिशय सुरक्षित असल्याचे सांगितले. स्री स्वाभिमान प्रकल्पाच्या वतीने रोही यांनी विद्यार्थिनींना स्वच्छता पॅडच्या उपयोजनासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी उपशिक्षक भाऊसाहेब साबळे, भास्कर कानवडे, भास्कर सदगीर, चंदन भारती आदींसह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
------------------
वावी येथील स्री स्वाभिमान केंद्राच्या वतीने ‘घे भरारी’ आरोग्य अभियानांतर्गत आदिवासी भागातील शाळेतील विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी दिव्यांग उद्योजक रवि सुपेकर, गोरक्षनाथ वाकचौरे, भाऊसाहेब साबळे, भास्कर कानवडे, भास्कर सदगीर, चंदन भारती यांच्यासह विद्यार्थिनी. (२८ वावी)
===Photopath===
280121\28nsk_30_28012021_13.jpg
===Caption===
२८ वावी