घोरवडला महामार्गाच्या कामामुळे जलवाहिनी फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 09:55 PM2020-06-25T21:55:27+5:302020-06-25T21:56:25+5:30
सिन्नर : तालुक्यातील घोरवड येथे समृद्धी महामार्गाच्या कामातील अवजड दगड नाल्यात टाकण्यात आले. त्यामुळे तेथे असलेली पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी फुटली आहे. तथापि, कंपनीकडून त्याची दुरुस्ती होत नसल्याने गावचा पाणीपुरवठा आठ दिवसांपासून ठप्प आहे. दरम्यान, तातडीने दुरुस्ती न झाल्यास समृद्धी महामार्गाची वाहने अडविण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

बीएससीपीएल कंपनीकडून घोरवड परिसरात समृद्धी महामार्ग विकासाचे काम केले जात आहे. १५ जूनला गावालगतच्या म्हसाळ वस्तीवरील खोल नाल्यात महामार्गाच्या कामात निघालेले अवजड दगड टाकण्यात आले. त्याखालून गावाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जाते. अवजड दगडांमुळे ही वाहिनी फुटली. हे दगड जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करणे ग्रामपंचायतीला अवघड झाले. सरपंच रमेश हगवणे, ग्रामसेवक योगेश चित्ते यांनी कंपनीचे जनसंपर्क अधिकारी अभिषेक दुबे, अधिकारी भास्कर यांना भेटून दुरुस्ती करण्याची मागणी केली.