घोटी बाजार समिती बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:16 AM2021-05-25T04:16:28+5:302021-05-25T04:16:28+5:30
बाजार समितीचे मुख्य बाजार आवार घोटी शहराच्या मध्यवर्ती वस्तीत असून बाजार आवाराची जागा अत्यंत तोकडी २ एकर जागेत आहे. ...
बाजार समितीचे मुख्य बाजार आवार घोटी शहराच्या मध्यवर्ती वस्तीत असून बाजार आवाराची जागा अत्यंत तोकडी २ एकर जागेत आहे. बाजार आवार बंदिस्त नसून गावातील अनेक नागरी वस्त्यांचे रहदारीचे रस्ते पूर्वीपासून बाजार आवारातून आहेत. त्यामुळे बाजार आवारामध्ये प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे, सामाजिक अंतर राखणे, एका गेटमधून प्रवेश आणि दुसऱ्या गेटमधून बाहेर जाणे या बाबींचा अवलंब करणे बाजार समितीला शक्य नाही. बाजार समितीमध्ये पूर्वीपासून लिलाव पद्धत अवलंबली जात नाही. शेतकरी व व्यापारी यांचे वटाव पद्धतीने व्यवहार होत असल्याकारणाने गर्दी टाळणे शक्य होणार नाही. यासह होणाऱ्या विविध अडचणींचे पत्र बाजार समितीच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. बाजार समिती आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने कर्मचारी पथक नेमणे बाजार समितीला शक्य होणार नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
इन्फो
खंबाळे शिवारात खरेदी-विक्री
घोटीजवळील २ किलोमीटर अंतरावर खंबाळे शिवारात भाजीपाला खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असून या ठिकाणी मुंबई, कल्याण, ठाणे, वसई, पालघर, जव्हार या ठिकाणाहून व्यापारी मोठ्या प्रमाणात येत असतात. मोठ्या प्रमाणात शेतीमालाची आवक - जावक होत असते. खंबाळे शिवारात हा बाजार बऱ्याच दिवसांपासून भरत असून यावर कुणाचाही अंकुश नसून मोठ्या प्रमाणात शेकडो गाड्यांचा बाजार या ठिकाणी भरलेला होता. लांबच लांब रांगा महामार्गालगत दिसत होत्या. प्रचंड गर्दीत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली होताना दिसत होती.
इन्फो
तातडीची बैठक
प्रशासकीय पातळीवर संध्याकाळी उशिरा चर्चा करून तहसीलदार परमेश्वर कासुळे, घोटीचे सहा. पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, सहायक उपनिबंधक अर्चना सैंदाने, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकीय अधिकारी सांगळे यांनी बैठक घेऊन उपाययोजना राबविण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आणि खंबाळे येथे अँटिजन टेस्ट, तसेच उपाययोजना सुरू करण्यात आल्याची माहिती तहसीलदार कासुळे यांनी दिली.
फोटो- २४ घोटी बाजार १
खंबाळे शिवारातील भरलेला बाजार.
===Photopath===
240521\24nsk_41_24052021_13.jpg
===Caption===
फोटो- २४ घोटी बाजार १ खंबाळे शिवारातील भरलेला बाजार