घोटीत भजनमहोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 11:09 PM2018-08-13T23:09:03+5:302018-08-13T23:10:04+5:30
घोटी येथील नटराज लोककला अकॅडमीच्या पुढाकारातून घोटी येथे श्रावणी भजनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर घोटी शहरात श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी भजनांचा गजर सुरू होता.
नरहरी महाराज सभागृहात हा सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शाहीर परिषदेचे जिल्हाध्यक्ष विश्वास कांबळे, भागीरथ मराडे, मोहन भगत, रामदास शेलार, बाळासाहेब धुमाळ, अशोक धांडे, रवि गुंजाळ, मूळचंद भगत, पांडुरंग वारु ंगसे, उद्धव हांडे, विष्णुबुवा जोशी आदी उपस्थित होते. महोत्सवाचे उद्घाटन दत्त संप्रदायाचे सावळीराम महाराज शिंगोळे, कीर्तनकार धनंजय महाराज गतीर, चंद्रकांत महाराज पगार, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. भजनमहोत्सवात तालुक्यातील जवळपास ५५ भजनी मंडळांनी सहभाग घेतला. प्रास्तविक शाहीर बाळासाहेब भगत यांनी केले, सूत्रसंचालन बाळासाहेब पलटणे यांनी केले.