घोटीत अत्यावश्यक सेवा वगळता १५ दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 02:35 PM2020-07-24T14:35:56+5:302020-07-24T14:36:03+5:30
नांदूरवैद्य - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे गेल्या सात दिवसापासून घोटी शहरात लोकडाऊन सुरू होते. या लॉकडाऊनची मुदत गुरु वार रोजी संपत आली. त्यामुळे शुक्र वारपासून घोटीत शुक्र वार ते रविवार तीनच दिवस दुकाने उघडणार असून २७ जुलैपासून पुन्हा १५ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात येणार आहे.
नांदूरवैद्य - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे गेल्या सात दिवसापासून घोटी शहरात लोकडाऊन सुरू होते. या लॉकडाऊनची मुदत गुरु वार रोजी संपत आली. त्यामुळे शुक्र वारपासून घोटीत शुक्र वार ते रविवार तीनच दिवस दुकाने उघडणार असून २७ जुलैपासून पुन्हा १५ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात येणार आहे. घोटी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी भीती व्यक्त केली आहे. तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागातही आता हा प्रादुर्भाव वाढत गेल्याने त्यामुळे घोटी बाजारपेठेतही काहीशी चिंतेचे वातावरण आहे. याच पाशर््वभूमीवर गेल्या १५ दिवसात दुसऱ्यांदा सात दिवसाचे लॉकडाऊन करण्यात आले. गेल्या शुक्र वारपासून ते दि २३ जुलैपर्यंत सात दिवसाचे लॉकडाऊन सुरू होते. मेडिकल व वैद्यकीयसेवा वगळता सर्वच घटकांचा यात समावेश होता. इगतपुरी येथे शासकीय अधिकारी व निवडक पदाधिकारी, व्यापारी यांची बैठक झाली. या बैठकीत कोरोनाचा वाढता प्रसार व प्रादुर्भाव यावर गांभीर्याने चर्चा झाली. सुरू असलेले लॉकडाऊन पुढे वाढविण्याऐवजी तीन दिवसांचा ब्रेक देऊन पुन्हा १५ दिवसांचा लॉकडाऊन करण्याबाबत चर्चा होऊन त्यावर शिक्कामोर्तब झाले. शुक्र वार, शनिवार व रविवार हे तीन दिवस ग्रामस्थ व नागरिकांना आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घोटी शहरातील दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत उघडी राहणार आहे . मात्र सोमवार दि २७ जुलै ते १० आॅगस्ट या १५ दिवसाच्या कालावधीत घोटी शहर पुन्हा बंद राहणार आहे. घोटी ग्रामपालिकेनेही याबाबत दवंडीपत्रक प्रसिद्ध केले आहे.