घोटी ग्रामपंचायतीत सत्तांतर

By admin | Published: June 23, 2014 11:28 PM2014-06-23T23:28:30+5:302014-06-24T00:36:35+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यातघोटी ग्राम-पंचायतीच्या निवडणुकीत सत्तांतर केले आहे. पॅनलला १७ पैकी सोळा जागा मिळाल्या.

Ghoti Gramapanchayati Permanent | घोटी ग्रामपंचायतीत सत्तांतर

घोटी ग्रामपंचायतीत सत्तांतर

Next

घोटी : इगतपुरी तालुक्यात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या घोटी ग्राम-पंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी आपलं पॅनलच्या बाजूने कौल देत, सत्तांतर केले आहे. पॅनलला १७ पैकी सोळा जागा मिळाल्या. उर्वरित एक जागा अपक्षाच्या ताब्यात गेली आहे.
या निवडणुकीत विद्यमान उपसरपंचासह अन्य सदस्यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. धक्कादायक निकालात युवकांना मोठ्या प्रमाणात संधी मिळाली
आहे.
माघारीच्या प्रक्रियेनंतर वॉर्ड क्र. २ मधून रामदास शेलार, मीराबाई आंबेकर, राजेंद्र माळचे यांच्यासह वॉर्ड ६ मधून मीना झोले हे चौघे बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर तेरा जागांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. आज इगतपुरी येथे मतमोजणी झाली. मतमोजणीत अनेक दिग्गजांना धक्का देत शहरातील संतोष दगडे, रामदास शेलार, संजय जाधव, अण्णासाहेब डोंगरे, नंदकुमार वालझाडे, सुनील जाधव आदिंच्या नेतृत्वाखालील आपलं पॅनलने सोळा जागांवर निर्विवाद बहुमत प्राप्त करून प्रतिष्ठेची समजली जाणारी ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यात यश मिळविले. यात संतोष दगडे, प्रा. मनोहर घोडे, जयप्रकाश झोले, मदन रुपवते, समाधान जाधव आदि मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.
निकाल जाहीर होताच समर्थक आणि कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत संताजी मित्रमंडळ, महाराणा प्रताप मित्रमंडळ, शिवमल्हार मित्रमंडळ, प्रबुद्ध मित्रमंडळ, श्रीराम मित्रमंडळ आदि मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)विजयी उमेदवार ४वॉर्ड क्र .१ मीराबाई काळे (८०७), मदन रु पवते (७७६), वॉर्ड २ रामदास शेलार, मीराबाई आंबेकर व राजेंद्र माळचे (सर्व बिनविरोध), वॉर्ड क्र .३ जयप्रकाश झोले (८३७), लता जाधव (८९५), इंदुमती अस्वले (७७४), वॉर्ड क्र . ४ मंगल आरोटे (११४२), कोमल गोनके (११३५), धोंडीराम कौले (७१९), वॉर्ड ५ संतोष दगडे (१०५८), प्रा.मनोहर घोडे (१०७३), कोंड्याबाई बोटे (१०१६), वॉर्ड क्र .६ समाधान जाधव (५६४), आशाबाई जाधव (६२१),मीना झोले (बिनविरोध).

Web Title: Ghoti Gramapanchayati Permanent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.