घोटी-सिन्नर महामार्गाची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 01:20 PM2018-08-23T13:20:48+5:302018-08-23T13:20:57+5:30
घोटी : महाराष्ट्र राज्यात भाविक व पर्यटकांनी खुलून जाणारा महामार्ग म्हणून घोटी -सिन्नर- शिर्डी या महामार्गाची ओळख आहे. मात्र विकासाकडे जाणाऱ्या या महाराष्ट्रात या महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे.
घोटी : महाराष्ट्र राज्यात भाविक व पर्यटकांनी खुलून जाणारा महामार्ग म्हणून घोटी -सिन्नर- शिर्डी या महामार्गाची ओळख आहे. मात्र विकासाकडे जाणाऱ्या या महाराष्ट्रात या महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. भाविक प्रवाशांना वाहन चालवताना तर नाशिकमार्गे सिन्नरला गेलो असतो तर बरे झाले असते असे म्हणायची वेळ येते. दरम्यान गेल्याच महिन्यापूर्वी या रस्त्याची नावाला डागडुजी केली होती. परंतु ही तात्पुरती मलमपट्टीही खड्डयात गेली . यापूर्वी हा मार्ग राज्यमार्ग होता तसेच या मार्गाचा कारभार रस्ते विकास महामंडळाकडे होता.मात्र आता या मार्गाला केंद्र शासनाने महामार्गाचा दर्जा दिला आहे. एवढेच नव्हे तर घोटी -सिन्नर हा मार्ग बांधकाम विभागाकडे वर्ग करूनही या महामार्गाची खड्डयांची साडेसाती मात्र अद्यापही कायम असल्याने वाहनचालक वाहन चालवताना परेशान होतात. इगतपुरी तालुक्यातील घोटी- सिन्नर -शिर्डी हां महामार्ग असूनही या मार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे . या रस्त्यावरून वाहने चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी करावी लागत आहे.गेली अनेक वर्षपासून या रस्त्याची दुरु स्ती न झाल्याने या पावसाळ्यात हे रस्ते नष्ट झाले असल्याचे चित्र दिसते.दरम्यान सर्वाधिक घोटी सिन्नर या जास्त वर्दळीच्या रस्त्याची अक्षरश: खड्ड्यामुळे चाळण झाल्याने दुरावस्था झाली असून पावसामुळे हा रस्ता संपुष्टात आला आहे. त्यामुळे कुठे नेउन ठेवलाय घोटी सिन्नर साईमार्ग माझा ? असे म्हणण्याची वेळ वाहनचालक साईभक्त व पर्यटकांवर आली आहे. अनेक गावांचा या रस्त्याचा वापर करून घोटीशी संपर्क येतो. घोटी सिन्नर शिर्डी असा हां साईमार्ग असल्याने दररोज हजारो वाहने याच मार्गाने शिर्डीला ये-जा करतात तसेच प्रवासी ,भाविक याच मार्गाने प्रवास करतात.तसेच कळसुबाई शिखर, टाकेद, शुक्लतीर्थ, खेडचे भैरवनाथ देवस्थान यासाठी भाविकांची या मार्गावरु न सातत्याची वर्दळ सुरूच असते.
-----------------
शासन एकीकडे इगतपुरी तालुक्याकडे पर्यटक आकर्षित करण्यासाठी विविध योजना जाहीर करून सुविधा निर्माण करण्याची घोषणा करतात. प्रत्यक्षात मात्र या घोषणाच ठरत आहेत. घोटी- सिन्नर हा महामार्ग सार्इं मार्ग म्हणून देशाला परिचित असुनही आज या महामार्गाची अक्षरश चाळण झालेली असतांनाही कुणीच लक्ष देण्यास तयार नाही.घोटी येथून या महामार्गावर येताच वाहनचालक, पर्यटक व प्रवाशांना डोक्याला हात लावायची वेळ येते.बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन त्वरित खड्डे बुजवावेत. आगामी काळात या मार्गावर खड्डे होणार नाहीत यासाठी घोटी ते पांढुर्ली दरम्यान हा महामार्ग कॉन्क्र ेटीकरण करावा.
- पांडूरंग वारूंगसे, माजी उपसभापती