‘जायंट्स’ने लोकहिताची कामे करावीत : विजयकुमार चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 01:12 AM2018-10-09T01:12:34+5:302018-10-09T01:13:23+5:30
जायंट्स वेल्फेअरच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करण्यात येत असून, भविष्यात आणखी भरीव कार्य करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे प्रतिपादन जायंट्सचे विश्व उपाध्यक्ष विजयकुमार चौधरी यांनी केले.
त्र्यंबकेश्वर : जायंट्स वेल्फेअरच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करण्यात येत असून, भविष्यात आणखी भरीव कार्य करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे प्रतिपादन जायंट्सचे विश्व उपाध्यक्ष विजयकुमार चौधरी यांनी केले. त्र्यंबकेश्वर येथे जायंट्स वेल्फेअर फाउण्डेशन फेडरेशन २ अची तृतीय बैठक त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या हॉलमध्ये संपन्न झाली. या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी फेडरेशन २ अच्या अध्यक्ष सुलोचना चौधरी होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार उपस्थित होते.
या बैठकीस त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर व उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी जायंट्सचे स्पेशल कमिटी सदस्य माजी अध्यक्ष बाबूराव बगाडे, डी. एल. जाधव अनुप जोशी आदींनी मार्गदर्शन केले. या बैठकीत समाजपयोगी कार्याचा पर्यावरणावर विशेष लक्ष देउन पर्यावरणाचा समतोल राखणे यावर भर देण्यात आला. या तृतीय बैठकीचे उदघाटन नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांनी केले. यावेळी पुरु षोत्तम लोहगावकर यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व शहरातील प्रदुषण हटविण्यासाठी संपुर्ण ब्रम्हगिरीवर वृक्ष लागवड पालिकेने केली आहे. या बैठकीसाठी फेडरेशन २अ अंतर्गत असलेल्या यवतमाळ नागपुर शेगाव अमरावती वरुड खामगाव नंदुरबार शिरपूर दोंडाईचा शहादा धुळे व नाशिक येथील कौन्सिल सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.