सोमेश्वर मंदिरात दिव्यांग भाविकांसाठी खुर्च्या भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 05:15 PM2020-01-23T17:15:42+5:302020-01-23T17:17:19+5:30
दिव्यांग भाविकांना सोमेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी कसरत करावी लागत असल्याने दोन व्हीलच्या भेट दिल्या.
नाशिक : दिव्यांग भाविकांना सोमेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी कसरत करावी लागत असल्याने दान फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश शर्मा यांनी दिव्यांग भाविकांसाठी दोन व्हीलच्या खुर्च्या नगरसेवक विलास शिंदे यांच्या उपस्थितीत भेट दिल्या.
गंगापूर रोडवरील अतिप्राचीन महादेवाचे मंदिर असून याठिकाणी अनेक प्रकारचे भाविक येत असतात. यामध्ये सर्वसाधारण असलेल्या भाविकांना दर्शन घेण्यासाठी व चढ उत्तर करण्यासाठी काही अडचण नसते मात्र दिव्यांग भाविकांना पार्किंग पासून ते थेट मंदिरापर्यंत येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश शर्मा, पराग साळुंके व महिला सदस्यांनी मिळून सोमेश्वर महादेव मंदिरा संस्थानला दोन व्हीलच्या खुर्च्या संस्थांनाच्या माजी अध्यक्ष बाळासाहेब लांबे व गोकुळ पाटील यांच्याकडे भेट देण्यात आला. यावेळी शिवसेना गटनेते विलास शिंदे, सातपूर प्रभागाचे सभापती संतोष गायकवाड, नगरसेवक राधा बेंडकुळे, मुरलीधर पाटील, दत्तू पाटील, कडलग आदी उपस्थितीत होते.