सिन्नर वाचनालयाकडून अभ्यासिकेला कपाटांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:17 AM2021-07-14T04:17:09+5:302021-07-14T04:17:09+5:30
------------------- पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित सिन्नर : शहर व ग्रामीण भागात काही प्रमाणात का होईना पावसाचे कमबॅक झाल्याने ...
-------------------
पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
सिन्नर : शहर व ग्रामीण भागात काही प्रमाणात का होईना पावसाचे कमबॅक झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या अद्याप झालेल्या नाही तर ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या, त्या वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. सोमवारपासून कमी अधिक प्रमाणात तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
--------------------
२५ वर्षांनंतर सुटला रस्त्याचा प्रश्न
सिन्नर : तालुक्यातील मापारवाडी ते तळ्यातील भैरवनाथ रस्त्या काम होत असल्याने २५ वर्षांनंतर मागणी पूर्ण झाली आहे. २५ वर्षे सातत्याने विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांनी पाठपुरावा केला. प्रश्न किरकोळ असूनही ते सुटत नव्हते. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे मागणी केल्यानंतर मळहद्दीतील प्रश्न मार्गी लागल्याची माहिती बाळासाहेब गाडे, दिलीप मुरकुटे, रामेश्वर गाडे, गणेश तटाणे, संतोष विघे, रामनाथ तुंगार, शिवाजी काकड, रामदादा काकड, फकिरा हिरे, दशरथ काकड, रामभाऊ गाडे, राहुल गाडे, वसंत उगले यांनी दिली.