मुस्लिम समाजबांधवांकडून पाच ऑक्सिजन सिलेंडर भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:15 AM2021-05-11T04:15:36+5:302021-05-11T04:15:36+5:30
कोविड-१९ चा सामना देशातील सर्वच घटकांना करावा लागत आहे. कोरोनामुळे जवळच्या अनेक मित्रपरिवारातील घटकांना त्रास झाला. अनेकांना ऑक्सिजन मिळाला ...
कोविड-१९ चा सामना देशातील सर्वच घटकांना करावा लागत आहे. कोरोनामुळे जवळच्या अनेक मित्रपरिवारातील घटकांना त्रास झाला. अनेकांना ऑक्सिजन मिळाला नसल्याने प्राण गमावावा लागला. त्यामुळे ऑक्सिजन ही काळाची गरज ओळखून मानूर कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलेंडर भेट देण्याचा निर्णय मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला. मानूर कोविड सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण यांच्याकडे ऑक्सिजन सिलेंडर सुपूर्द करण्यात येऊन कोविड सेंटरमध्ये दाखल असलेले कोरोना रुग्ण बरे व्हावे यासाठी मुस्लिम बांधवानी यावेळी प्रार्थना केली. यावेळी मौलाना आरिफ, मोयोद्दीन शेख, नाझीम मिर्झा, जब्बार तांबोळी, मजर शेख, सोहेब शेख, अन्वर शहा आदी उपस्थित होते. रमजान महिन्याचा २६ वा उपवास असल्याने मुस्लिम समाज व पंच कमिटी यांच्या माध्यमातून ऑक्सिजन सिलेंडर देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
फोटो- १० कळवण ऑक्सिजन
मानूर येथील कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलेंडर भेट देताना मुस्लिम समाजबांधव.
===Photopath===
100521\10nsk_37_10052021_13.jpg
===Caption===
फोटो- १० कळवण ऑक्सिजन मानूर येथील कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलेंडर भेट देताना मुस्लिम समाज बांधव.