ट्रम्प दाम्पत्याला टोपी-उपरणे, साडी अन् कांदे भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 05:44 AM2020-02-16T05:44:14+5:302020-02-16T05:44:35+5:30
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना शेतकऱ्याचे पत्र । कांदा उत्पादकांच्या मांडल्या व्यथा
नाशिक : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलनिया यांना निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकºयाने गांधी टोपी, उपरणे, साडी व कांदे भेट म्हणून पाठविले आहेत. सोबत कांदा उत्पादकांच्या व्यथा त्यांना लिहिलेल्या पत्रातून मांडल्या आहेत. नाशिकच्या कांद्याची अमेरिकेत निर्यात व्हावी, यासाठी ट्रम्प यांनी प्रयत्न करण्याची विनंतीही शेतकºयाने केली आहे.
२४ आणि २५ फेब्रुवारीला ट्रम्प दाम्पत्य भारताच्या दौºयावर येत असून त्यांच्या मेजवानीत कांद्याचा वापर करावा यासाठी नैताळे येथील शेतकरी संजय साठे यांनी कांदे पाठवले आहेत. संबंधित भेट त्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे दिल्लीत पाठविली आहे. सोबत एक पत्र, टोपी, शाल, आणि पत्नीसाठी साडीही पाठवली आहे. त्यात महाराष्टÑाचा कांदा आरोग्यास कसा चांगला आहे, हे सांगितले आहे. आपण अमेरिकेसाठी येथून कांदा आयात करावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे भारतातील शेतकऱ्यांचे जीवनमान कसे उंचावेल, कर्जातून कशी मुक्तता मिळेल यासाठी शिष्टाई करावी, असे आवाहन ट्रॅम्प यांना केले आहे. साठे यांनी यंदा कांद्याची लागवड केली परंतु अवकाळी पावसामुळे कांद्याचे अतोनात नुकसान झाले. निर्यात बंदीमुळे अपेक्षित भाव मिळाला नाही.
अमेरिकेला कांदा निर्यात करून शेतकºयांना दिलासा मिळावा म्हणून तेथील राष्ट्राध्यक्षांना कांदा पाठून जेवणाच्या मेजवणीत खाण्याचे आवाहन केले आहे.
- संजय साठे,
शेतकरी, नैताळे