नव्या वर्षात महापालिकेच्या बससेवेचे गिफ्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 01:01 AM2018-12-25T01:01:59+5:302018-12-25T01:02:33+5:30
शहर बस वाहतूक सुरू करण्याचा बहुचर्चित प्रस्ताव अखेर प्रशासनाला प्राप्त झाला असून, त्यामुळे महापालिकेच्या कार्यवाहीला आता वेग येणार आहे. तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीत त्यांनी प्रचंड पाठपुरावा करूनही महासभेचा हा प्रस्ताव रोखून ठेवण्यात आला होता. मात्र आता तो प्रशासनाला प्राप्त झाला
नाशिक : शहर बस वाहतूक सुरू करण्याचा बहुचर्चित प्रस्ताव अखेर प्रशासनाला प्राप्त झाला असून, त्यामुळे महापालिकेच्या कार्यवाहीला आता वेग येणार आहे. तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीत त्यांनी प्रचंड पाठपुरावा करूनही महासभेचा हा प्रस्ताव रोखून ठेवण्यात आला होता. मात्र आता तो प्रशासनाला प्राप्त झाला असून, बससेवा संचलित करण्यासाठी कंपनी गठित होताच निविदा मागवल्या जाणार असून, त्यामुळे नव्या वर्षात महापालिकेच्या बससेवेचे गिफ्ट नाशिककरांना मिळणार आहे. नाशिक शहराची बससेवा तोट्यात असल्याने राज्य परिवहन महामंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून ही बससेवा सुरू करण्यात येणार असून, महापालिकेनेच ती चालवावी यासाठी प्रयत्न केले जात आहे.
निविदा मागविण्याचा मार्ग मोकळा
महापालिकेने खासगी संस्थेच्या माध्यमातून प्रतिकिलोमीटर दराने रक्कम देऊन बससेवा चालविण्याची तयारी केली आहे. महापालिकेचा ठराव न आल्याने बससेवा चालविण्यासाठी निविदा मागवण्याचीच प्रतीक्षा होती. मात्र आता निविदा मागविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुसरीकडे प्रशासनाने या दरम्यान बससेवेसाठी मार्ग, थांबा आणि बस डेपोसह अन्य तयारी आरंभली आहे.