आयुक्तालयातील ग्रंथालयास तीन हजार पुस्तकांची भेट

By admin | Published: October 16, 2016 11:07 PM2016-10-16T23:07:15+5:302016-10-16T23:16:15+5:30

वाचन प्रेरणा दिन : पोलीस प्रशासनाचा सामाजिक उपक्रमावर भर

Gift of three thousand books to the library in Ayodhya | आयुक्तालयातील ग्रंथालयास तीन हजार पुस्तकांची भेट

आयुक्तालयातील ग्रंथालयास तीन हजार पुस्तकांची भेट

Next

नाशिक : पोलीस आयुक्तालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त सुरू करण्यात आलेल्या ग्रंथालयास दानशूरांनी आतापर्यंत तीन हजार पुस्तके भेट दिल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी केले़ गत सहा दिवसांत पोलिसांनी सामाजिक घटकांशी संवाद साधून तणावाची परिस्थिती कौशल्याने हाताळली़ नागरिकांनी पोलिसांवरचा विश्वास वाढविण्यासाठी विविध सामाजिक उपक्रमावर भर दिला जात
असल्याचे सिंघल यांनी सत्कारप्रसंगी सांगितले़
पोलीस आयुक्तालयाने सुरू केलेल्या सामाजिक उपक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभतो आहे़ पोलीस आयुक्तालय व प्रत्येक पोलीस ठाण्यात मोठी ग्रंथालये तयार करण्यात येणार आहेत़ या पुस्तकांचा लाभ वंचित तसेच झोपडपट्टीतील गरजू मुलांना होेणार आहेत़
शहरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर समाजकंटकांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याने काळ व वेळेचा विचार न करता आदेशाची अंमलबजावणी केली़ तसेच प्रसंगी बळाचाही वापर केला़
पोलीस आयुक्तालयात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी फ्रावशीचे संचालक रतन लथ, सोमनाथ राठी, पंकज मालपाणी, प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, पुष्पा राठी, रूचा राठी, नाशिक बुक सेलर असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पवार, माजी अध्यक्ष वसंतराव खैरनार, जीवनजीत पब्लिकेशनचे मंजू मालपाणी, नवनीत प्रकाशनचे आहिरे, इस्कॉनचे प्रकाश कलंत्री, निवृत्त पोलीस अधीक्षक दिलीप निकम, मिलिंद दंडे, प्रकाश मेहरोलिया, रोहन जाधव यासह महेंद्र गु्रप, फ्रावशी अकॅडमी, सरस्वती बुक डेपो, राष्ट्रीय एकता मंच, हौसला यांनी पुस्तके भेट दिली़
या कार्यक्रमप्रसंगी पोलीस उपआयुक्त विजय पाटील, श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त सचिन गोरे, डॉ. राजू भुजबळ, अतुल झेंडे, विजयकुमार चव्हाण, बजबळे, पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, सोमनाथ तांबे,
प्रकाश सपकाळे, विजय करंजकर यांच्यासह विविध अधिकारी
व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Gift of three thousand books to the library in Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.