कोळगावमाळ प्राथमिक शाळेला शालोपयोगी साहित्याची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:14 PM2019-09-17T23:14:30+5:302019-09-18T00:24:54+5:30
सिन्नर तालुक्यातील कोळगावमाळ येथील प्राथमिक शिक्षकाकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस टू इन वन प्रिंटर भेट तसेच सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेकडून शाळेस ग्रंथालय पुस्तके व शैक्षणकि साहित्य भेट देण्यात आली.
पाथरे : सिन्नर तालुक्यातील कोळगावमाळ येथील प्राथमिक शिक्षकाकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस टू इन वन प्रिंटर भेट तसेच सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेकडून शाळेस ग्रंथालय पुस्तके व शैक्षणकि साहित्य भेट देण्यात आली.
कोळगावमाळ येथील ग्रामस्थ व जिल्हा परिषद शाळा झापेवाडी येथील मुख्याध्यापक नंदराम भिमाजी मोकळ यांच्याकडून कोळगाव शाळेला एक टू इन वन प्रिंटर प्रदान करण्यात आले. त्याच बरोबर सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप मोकळ परिवाराकडून करण्यात आले. त्यानिमित्ताने शाळेच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेकडून शाळेस ग्रंथालय पुस्तके व शैक्षणकि साहित्य भेट देण्यात आले.
मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे आणि याच शाळेने मला घडविले म्हणूनच आज मी शिक्षक होऊ शकलो म्हणून माझ्या शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची मला जी संधी मिळाली त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो असे मत मोकळ यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मतीन पठाण, सेव्ह द चिल्ड्रन संस्थेचे माधव आव्हाड, ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती कुमावत, किरण चंद्रे, ज्ञानेश्वर मोकळ, उत्तम मोकळ, बाळासाहेब मोकळ, वाल्मीक जुंधारे, गंगाराम बर्डे, गुलाब पटेल, अनिल मोकळ, साईनाथ बर्डे, बापूसाहेब भालेराव यांच्यासह अनेक ग्रामस्थ व मान्यवर तसेच शाळेच्या मुख्याध्यापक शीतल सोनगडकर आदी उपस्थित होते. दीपक घाडगे यांनी प्रास्ताविक केले. शरद शेरकर यांनी सूत्रसंचालन केले. सुवर्णा थोरात यांनी आभार मानले.