खोसकर यांच्या अंगणवाड्यांना भेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:39 AM2018-09-12T00:39:26+5:302018-09-12T00:39:55+5:30
पोषण आहार सप्ताहानिमित्त जिल्हा परिषदेच्या महिला व बाल-कल्याण सभापती अपर्णा खोसकर यांनी सायखेडा परिसरातील अंगणवाड्यांसह जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना भेटी दिल्या.
सायखेडा : पोषण आहार सप्ताहानिमित्त जिल्हा परिषदेच्या महिला व बाल-कल्याण सभापती अपर्णा खोसकर यांनी सायखेडा परिसरातील अंगणवाड्यांसह जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना भेटी दिल्या. केंद्र आणि राज्य सरकारच्या पोषण आहार योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्यात पोषण आहार जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत आहार दिंडी, सकस आहारवाटप, महिलांमध्ये जनजागृती, असे विविध उपक्र म राबविण्यात येत आहेत. याच धर्तीवर नाशिक जिल्हा परिषदच्या महिला व बाल कल्याण सभापती अपर्णा खोसकर आणि सदस्य सुरेश कमानकर यांनी अनेक अंगणवाडी आणि शाळांना भेटी देऊन प्रत्यक्ष मोहिमेच्या अंमलबजावणी संदर्भात माहिती घेतली. यावेळी दीपक कमानकर, गोरख खालकर, सोमनाथ खालकर, आरोग्यसेविका एस.बी. मोरे, ग्रामसेवक श्रीमती पी. एस. निपुनगळे उपस्थित होते.