दर मिळत नसल्याने गिलके, टरबूज फेकले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 00:56 IST2021-05-18T22:41:55+5:302021-05-19T00:56:46+5:30
ब्राह्मणगाव : बाजार समित्या बंद असल्याने भाजीपाल्याला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून येथील युवा शेतकरी सुनील मधुकर अहिरे यांनी त्यांचे एक एकर शेतातील गिलके, टरबूज तोडून फेकून दिले. आधीच अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकवताना शेतकऱ्यांना निसर्गाशी दोन हात करावे लागत आहेत.

भाव मिळत नसल्याने गिलके तोडून उकिरड्यावर टाकताना शेतकरी सुनील अहिरे, योगेश अहिरे.
ब्राह्मणगाव : बाजार समित्या बंद असल्याने भाजीपाल्याला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून येथील युवा शेतकरी सुनील मधुकर अहिरे यांनी त्यांचे एक एकर शेतातील गिलके, टरबूज तोडून फेकून दिले. आधीच अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकवताना शेतकऱ्यांना निसर्गाशी दोन हात करावे लागत आहेत.
महागडी बियाणे, महागडी औषधे, मजुरी नैसर्गिक वातावरणाचा फटका हे सर्व नुकसान सहन करत असताना त्यातच लॉकडाऊन लागल्यामुळे भाजीपाला विक्री मंदावली आहे. सात ते आठ रुपये किलोने बळजबरीने माल विक्री करावा लागत आहे . काही शेतकरी डोक्यावर पाटीत भाजीपाला घेऊन गल्लोगल्ली फिरून भाजीपाला विक्री करत आहेत. त्यातच पिकवकेल्या मालाला मोठी बाजार पेठ जवळ मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात गिलके उकिरड्यावर फेकून दिले जात आहेत.
आर्थिक फटका
सध्या हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी, वांगी, भेंडी, गवार या सर्व भाजीपाल्याची सारखीच अवस्था झाली आहे. टरबूज , खरबूज, कलिंगडाबाबत शेतकऱ्यांना मोठी आर्थिक अपेक्षा होती. मात्र चालू असलेल्या कोरोना महामारीमुळे शेती व शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. अनेक शेतकऱ्यांनी टरबूज विक्री न करताच शेतातच पडू दिले आहेत. कांद्याचे घसरते भाव त्यात कांदा मार्केट बंद असल्याने मोठ्या आर्थिक संकटात शेतकरी सापडला आहे.