नाशिक भाजपच्या संघटनात्मक जबाबदारीतून गिरीश महाजन मुक्त; दिली नवीन जबाबदारी
By संजय पाठक | Published: May 26, 2023 09:47 AM2023-05-26T09:47:52+5:302023-05-26T10:07:24+5:30
यापुढे विजय चौधरी, राजेंद्र गावित नवे शिलेदार संजय पाठक,दिली नवीन जबाबदारी.
नाशिक- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नव्या संघटनात्मक जबाबदारी देताना यापूर्वी नाशिकसह उत्तर महाराष्ट्राचे सर्वेसर्वा असलेले गिरीश महाजन यांना उत्तर महाराष्ट्रासह नाशिकच्या संघटनात्मक जबाबदारीतुन मुक्त केले आहे, त्यांच्या ऐवजी उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी विजय चौधरी तर नाशिक शहर आणि ग्रामीणची जबाबदारी राजेंद्र गावित यांना देण्यात आली आहे. हे दोघेही नंदूरबारचे आहेत.
२०१४ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्यापासून नाशिक जिल्ह्याची पालकमंत्री आणि संघटनात्मक जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे होती. गेल्यावर्षी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्यांना नाशिकचे पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता होती, मात्र ते हिरावले गेले दरम्यानच्या काळात महापालिका निवडणुकीची तयारी सुरू असताना नाशिक शहर प्रभारी म्हणून त्यांची तर सहप्रमुख म्हणून जयकुमार रावल यांची सहभागी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नव्या संघटना बदलात या दोघांनाही नाशिक मधून मुक्त करण्यात आले आहे.