सावाना कार्याध्यक्षपदी गिरीश नातू; प्रमुख सचिवपदी बोडके!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 01:16 AM2022-05-21T01:16:32+5:302022-05-21T01:17:09+5:30

सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन कार्यकारी मंडळाच्या पहिल्या सभेत कार्याध्यक्षपदी गिरीश नातू, प्रमुख सचिवपदी डॉ.धर्माजी बोडके, सहायक सचिव पदी ॲड.अभिजीत बगदे, तर अर्थसचिवपदी देवदत्त जोशी यांची निवड करण्यात आली.

Girish Natu as Savannah Executive Chairman; Bodke as Principal Secretary! | सावाना कार्याध्यक्षपदी गिरीश नातू; प्रमुख सचिवपदी बोडके!

सावाना कार्याध्यक्षपदी गिरीश नातू; प्रमुख सचिवपदी बोडके!

Next
ठळक मुद्दे सहायक सचिवपदी ॲड.अभिजीत बगदे आणि अर्थसचिवपदी देवदत्त जोशी यांची निवड

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन कार्यकारी मंडळाच्या पहिल्या सभेत कार्याध्यक्षपदी गिरीश नातू, प्रमुख सचिवपदी डॉ.धर्माजी बोडके, सहायक सचिव पदी ॲड.अभिजीत बगदे, तर अर्थसचिवपदी देवदत्त जोशी यांची निवड करण्यात आली.

 

सावानाच्या नूतन कार्यकारी मंडळाची पहिली सभा काल वस्तुसंग्रहालयात सावानाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सभेस उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव, डॉ.सुनील कुटे उपस्थित होते. या सभेपूर्वी सन २०१७-२०२२ व सन २०२२-२०२७ या दोन्ही कार्यकारी मंडळाची एकत्रित सभा अध्यक्ष प्रा.दिलीप फडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेनंतर नवीन पदाधिकारी निवडीच्या सभेस सुरुवात झाली. कार्याध्यक्षपदी गिरीश नातू, प्रमुख सचिव डॉ.धर्माजी बोडके, सहायक सचिवपदी ॲड.अभिजीत बगदे, अर्थसचिवपदी देवदत्त जोशी, ग्रंथसचिवपदी जयप्रकाश जातेगावकर, सांस्कृतिक कार्य सचिवपदी संजय करंजकर, नाट्यगृह सचिवपदी सुरेश गायधनी व वस्तुसंग्रहालयपदी प्रेरणा बेळे यांची टाळ्यांच्या गजरात निवड करण्यात आली. या सभेस उपाध्यक्ष डॉ.सुनील कुटे, वैद्य विक्रांत जाधव, नूतन कार्यकारी मंडळ सदस्य उदयकुमार मुंगी, गणेश बर्वे, मंगेश मालपाठक, प्रा.सोमनाथ मुठाळ, प्रशांत जुन्नरे, ॲड.भानुदास शौचे उपस्थित होते.

 

इन्फो

जुन्या कार्यकारी मंडळाकडून ग्वाही

माजी उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते व कार्यकारी मंडळ सदस्य बी.जी.वाघ या सभेप्रसंगी उपस्थित होते. यावेळी बोरस्ते, वाघ यांनी नूतन कार्यकारी मंडळास शुभेच्छा देतानाच, सावानाच्या हितासाठी तुमच्यासोबतच राहू, अशी ग्वाही दिली. तंटामुक्त सावानासाठी अध्यक्ष प्रा.दिलीप फडके यांच्याबरोबर कायम असल्याचे सांगितले. जुन्या कार्यकारी मंडळाचे ऋणनिर्देश मानून त्यांचे आभार मानण्यात आले, तर नूतन पदाधिकाऱ्यांना कार्यकारी मंडळ सदस्य, तसेच सावाना सेवकवृंदाने शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

इन्फो

तहकुबीची सूचना फेटाळली

पहिल्या सभेच्या प्रारंभी कार्यकारी मंडळ सदस्य श्रीकांत बेणी यांनी सभा तहकुबीची सूचना मांडली. मतदानातील आकडेवारीच्या घोळामुळे जनमानसामध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी संशय आहे. तो दूर करण्यासाठी फेरमतमोजणी हाच एकमेव उपाय असल्याने पदाधिकारी निवडीची सभा तहकूब करण्याची सूचना बेणी यांनी मांडली. या सूचनेस धर्माजी बोडके, सुरेश गायधनी यांनी विरोध नोंदविला. सभाध्यक्ष प्रा.फडके यांनी तहकुबीची सूचना फेटाळल्याचे जाहीर केले. हा निर्णय अमान्य असल्याचे सांगून श्रीकांत बेणी यांनी सभात्याग केला.

फोटो

२०गिरीश नातू, २०धर्माजी बोडके, २०ॲड.बगदे, २० देवदत्त जोशी

Web Title: Girish Natu as Savannah Executive Chairman; Bodke as Principal Secretary!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.