काननवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 03:22 PM2021-06-23T15:22:30+5:302021-06-23T15:22:53+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव लगत असलेल्या काननवाडी शिवारात कु. गौरी गुरुनाथ खडके तीन वर्षे वयाच्या बालिकेस मंगळवारी (दि.२२) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तिच्या कुटूंबियांसमोर बिबटयाने हल्ला करून जंगलाच्या दिशेने ओढत नेले. त्यात ही चिमुकली गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान तिचे निधन झाले. बिबट्याच्या तावडीतून गौरीला सोडवण्यात कुटुंबाला यश आले असले तरी गौरीची मृत्युशी झुंज अपयशी ठरली.

Girl killed in leopard attack in Kananwadi | काननवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू

काननवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू

Next

घोटी : इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव लगत असलेल्या काननवाडी शिवारात कु. गौरी गुरुनाथ खडके तीन वर्षे वयाच्या बालिकेस मंगळवारी (दि.२२) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तिच्या कुटूंबियांसमोर बिबटयाने हल्ला करून जंगलाच्या दिशेने ओढत नेले. त्यात ही चिमुकली गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान तिचे निधन झाले. बिबट्याच्या तावडीतून गौरीला सोडवण्यात कुटुंबाला यश आले असले तरी गौरीची मृत्युशी झुंज अपयशी ठरली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी गौरी घरासमोर आपल्या आई, वडील, आजोबा यांच्या सोबत बसली होती. याचवेळी मागून आलेल्या बिबट्याने गौरीवर हल्ला करून तिला कुटुंबासमोर फरफटत जंगलात ओढून नेण्यास सुरुवात केली. अचानक कोसळलेल्या या संकटामुळे कुटुंब भांबावले आणि त्यांनी गौरीला वाचवण्यासाठी आरडाओरड केली व बिबट्याचा पाठलागही केला. आरडाओरड झाल्याने बिबट्याने काही अंतरावर गुरतुलेच्या झुडपात गौरीला सोडून देत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. कुटुंबातील सर्वांनी गौरीला ताब्यात घेतले असता ती गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले. तिला तातडीने घोटी ग्रामीण रुग्णालयात नेऊन प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर प्रकृति बिघडल्याने तिला नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने बुधवारी (दि.२३) दुपारी तिची प्राणज्योत मालवली. दरम्यान खेड जवळील काननवाडी येथे घटनास्थळी वनविभागाच्यावतीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी २ पिंजरे लावले असून तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी इगतपुरी म.ब.पाटील, वनपरिमंडल अधिकारी डी. एस. ढोन्नर, वनरक्षक एम. जे. पडवी, एफ. जे. सैय्यद, सी. डी. गाढर, बी. एस. खाडे, एस. के. बोडके, के. एल. पोटींदे, वनमजूर दशरथ निर्गुडे, श्रावण निर्गुडे, पूणाजी कोरडे, भोरू धोंगडे, मुजीब शेख आदी तळ ठोकून बसले आहेत.
इन्फो

कुटुंबाचा लढा अपयशी...
चिमुकल्या गौरीला बिबट्या फरफटत नेत असतांना संपूर्ण कुटुंब तिच्या रक्षणासाठी धावले. बिबट्याचा प्रतिकार केला. जिवाच्या आकांताने आरडाओरडा करून हातात असेल ते भिरकावून बिबट्याच्या तावडीतून मुलीला सोडवले. संपूर्ण कुटुंबाने हिम्मत दाखवून लढा दिला. बिबट्याच्या तावडीतून सुटल्यानंतर गौरीला बघून तिच्या मातेने हंबरडा फोडला आणि आणि कुटूंबाने तिला घेऊन उपचारासाठी घोटी, नाशिक येथे दाखल केले. परंतु त्यात तिला वाचवण्यात अपयश आले. या बद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Girl killed in leopard attack in Kananwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक